नाफेडने ३० रुपये किलो प्रमाणे कांदा खरेदी करावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 00:38 IST2021-05-11T22:49:50+5:302021-05-12T00:38:05+5:30
लासलगाव : नाफेडने शेतकऱ्यांचा कांदा ३० रुपये प्रति किलो दराने खरेदी करावा यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने नाफेडकडे लेखी मागणी केलेली आहे,

नाफेडने ३० रुपये किलो प्रमाणे कांदा खरेदी करावा
ठळक मुद्देकांदा उत्पादकांच्या या मागणीस पाठिंबा द्यावा, असे आवाहन
लासलगाव : नाफेडने शेतकऱ्यांचा कांदा ३० रुपये प्रति किलो दराने खरेदी करावा यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने नाफेडकडे लेखी मागणी केलेली आहे, अशी माहिती राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी दिली. राज्यातील सर्व फार्मर्स प्रोड्युसर कंपन्यांनीही याबाबत नाफेडकडे लेखी स्वरूपात मागणी करावी व कांदा उत्पादकांच्या या मागणीस पाठिंबा द्यावा, असे आवाहनही दिघोळे यांनी केले आहे.