अनकाई सरपंचपदी नगिनाबाई कासलीवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:26 AM2021-03-04T04:26:17+5:302021-03-04T04:26:17+5:30
येवला : लक्षवेधी ठरलेल्या अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सामाजिक कार्यकर्ते अल्केश कासलीवाल यांच्या मातोश्री व स्व. डॉ. चंद्रकांत वैद्य ...
येवला : लक्षवेधी ठरलेल्या अनकाई ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सामाजिक कार्यकर्ते अल्केश कासलीवाल यांच्या मातोश्री व स्व. डॉ. चंद्रकांत वैद्य यांचे कट्टर समर्थक, माजी सरपंच बाबूशेठ कासलीवाल यांच्या पत्नी नगिनाबाई कासलीवाल व उपसरपंचपदी शिवम आहिरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अनकाई ग्रामपंचायत निवडणुकीत स्व. डॉ. चंद्रकांत वैद्य यांच्या विचाराने प्रेरित झालेल्या डॉ. प्रीतम वैद्य, अलकेश कासलीवाल, किरण बडे, शरद सोनवणे यांच्या नेतृत्त्वाखालील नवनिर्माण विकास पॅनलने एकतर्फी बहुमत मिळवत सत्ताधारी पॅनलचे नेते डॉ. सुधीर जाधव यांच्या पॅनलचा धुव्वा उडवत सत्ता हस्तगत केली होती. सरपंच - उपसरपंच निवडीप्रसंगी सरपंचपदासाठी कासलीवाल व उपसरपंच पदासाठी अहिरे यांचे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या नावाची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी मोटे,
तलाठी गिरी व ग्रामसेवक भाबड यांनी करताच आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य डॉ. प्रीतम वैद्य, अलकेश कासलीवाल, सागर सोनवणे, राजाराम पवार, सविता टिटवे उपस्थित होते. पॅनलचे प्रमुख मार्गदर्शक बाबूशेठ कासलीवाल, त्र्यंबक बडे, चंद्रभान व्यापारे, शांताराम पवार, शिवाजी व्यापारे, हरिभाऊ चव्हाण, मोतीराम वैद्य, केदू सोनवने, राणुबा वैद्य, नारायण वैद्य, तावबा सोनवणे, दत्तू सोनवणे आदींच्या पुढाकाराने बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाले. यावेळी बाळासाहेब चव्हाण, चेतन कासलीवाल, भगवान जाधव, रमेश देवकर, बाळू जाधव, अप्पा सोनवणे, उत्तम देवकर, संतोष सोनवणे, अशोक देवकर, राजेंद्र लालसिंग परदेशी, सागर परदेशी, मुकेश परदेशी, जितेंद्र गायकवाड, मयाराम नवले, रोहिदास भिडे, मारुती वैद्य, शंकर चव्हाण, शरद वैद्य, दीपक वाघ, सुधाकर सोनवणे, शशिकांत सोनवणे, कचरू सोनवणे आदी समर्थक उपस्थित होते.
-------------
कासलीवाल कुटुंब दहाव्यांदा ग्रामपंचायतीत
अनकाई ग्रामपंचायतीत बाबूशेठ कासलीवाल हे १९८४पासून ५ वेळा अन नगिनाबाई कासलीवाल या तिसऱ्यांदा निवडून आल्या आहेत. बाबूशेठ कासलीवाल हे १७ वर्षे उपसरपंच, तर ४ वर्षे सरपंच होते. यावेळच्या निवडणुकीत कुटुंबातील अलकेश कासलीवाल व त्यांच्या मातोश्री नगिनाबाई कासलीवाल दोघेही मोठ्या मताधिक्याने निवडून आले असून, माय-लेक निवडून येण्याचा इतिहास रचला.
आम्ही सर्वांना सोबत घेऊन काम करू. पॅनलने घोषित केलेल्या वचननाम्याप्रमाणे डिजिटल शाळेसाठी निधी मंजूर झाला असून, इतर कामे पूर्ण करत सर्वांगिण विकास करू. अनकाई किल्ल्यावर पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार आहे. त्यातून रोजगार निर्मिती होऊ शकते.
- अलकेश कासलीवाल, सदस्य, अनकाई (०३ अलकेश कासलीवाल) (०३ अनकाई)
===Photopath===
030321\03nsk_1_03032021_13.jpg
===Caption===
०३ अलकेशक कासलीवाल, ०३ अनकाई