पावसाअभावी नागली पीक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:07 PM2020-07-18T22:07:09+5:302020-07-19T00:39:44+5:30

पेठ : पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पेठ भागातील नागलीचे पीक करपू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यंदा नागलीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Nagli crop in crisis due to lack of rains | पावसाअभावी नागली पीक संकटात

पावसाअभावी नागली पीक संकटात

पेठ : पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने पेठ भागातील नागलीचे पीक करपू लागले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून, यंदा नागलीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
दरवर्षी जुलै महिन्यात भात व नागलीची लावणी पूर्ण करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. आषाढी एकादशीपर्यंत हमखास संततधार पाऊस सुरू होतो या आशेवर शेतकºयांनी डोंगर उतारावर नागली रोपांची लावणी केली. मात्र पंधरा दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने नागलीची रोपे करपली आहेत.
आदिवासी भागात भात व नागली या दोन्ही पिकांचे रोपे तयार करून नंतर लावणी केली जात असल्याने एकदा रोपे खराब झाल्यावर दुबार लावणी करणे शक्य नसते. त्यामुळे शेतकºयांना वर्षभराच्या पिकावर पाणी सोडून देण्याची वेळ आली आहे. प्रशासन व कृषी विभागाने तत्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई प्रस्ताव शासनास सादर करावेत, अशी मागणी करण्यात येत आहे.
\पेठ तालुक्यात यावर्षी पावसाने दडी मारल्याने नागली पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे. नागलीचे पीक डोंगर उतारावर घेतले जात असल्याने विद्युतपंप किंवा मशीनच्या साह्याने पाणी भरता येत नाही. शिवाय तयार झालेले रोप वाया गेल्याने पुन्हा रोप तयार करून लावणी करणे शेतकºयांना शक्य नसल्याने प्रशासनाकडून पंचनामे करण्याबाबत सुचवण्यात आले आहे.
- विलास अलबाड, सभापती, पंचायत समिती,पेठ

Web Title: Nagli crop in crisis due to lack of rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक