पेठ तालुक्यात नागली करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 04:49 PM2018-10-29T16:49:33+5:302018-10-29T16:50:49+5:30
पेठ - तालुक्यात पावसाने पुर्णपणे उघडीप दिल्याने सर्वाधिक फटका नागलीच्या पिंकांना बसला असून पावसाअभावी नागल्या करपल्या आहेत.
Next
ठळक मुद्देनागली हे सर्वाधिक पौष्टीक धान्य असल्याने शहरी भागात नागली व नागलीपासून तयार केलेल्या नानाविध खाद्यपदार्थांना मोठया प्रमाणावर मागणी असली तरी ज्या भागात नागलीचे पिक घेतले जाते. त्या पेठ, सुरगाणा तालुक्यात या वर्षी पावसाने उत्तरार्धात धोका दिल्याने नागलीचे प
पेठ - तालुक्यात पावसाने पुर्णपणे उघडीप दिल्याने सर्वाधिक फटका नागलीच्या पिंकांना बसला असून पावसाअभावी नागल्या करपल्या आहेत.
नागली हे केवळ खरीप हंगामात व पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणारे पिक आहे.आदिवासी शेतकरी डोंगर उतारावर नागलीचे रोपण करीत असतात. त्यातही भाताची लागवड झाल्यानंतर नागलीची लावणी केली जाते. या वर्षी प्रारंभी नागलीचे पिक जोमाने वाढले असले तरी अखेरच्या टप्प्यात पाऊस गायब झाल्याने नागलीची पिके करपली आहेत. त्यामुळे या वर्षी आदिवासी कुटुंबांच्या चुलीवरून नागली हद्दपार होते की काय अशी चिंता व्यक्त केली जात आहे.