पारंपारिक नागदेवतेच्या पूजनाने घराघरात नागपंचमी साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 06:28 PM2020-07-25T18:28:38+5:302020-07-25T18:31:11+5:30
पेठ : निसर्ग देवतेचा दर्जा असलेल्या नागाचे पारंपारिक पध्दतीने पूजन करून पेठ तालुक्यात घराघरात नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देअतिशय साधे पणाने व घरातच नागपंचमी साजरी करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : निसर्ग देवतेचा दर्जा असलेल्या नागाचे पारंपारिक पध्दतीने पूजन करून पेठ तालुक्यात घराघरात नागपंचमीचा सण साजरा करण्यात आला.
नागपंचमीच्या दिवशी ग्रामीण भागात घरातील भिंतीवर घरातील वृध्द वारली कलेचा आधार घेऊन नागदेवतेचे चित्र रेखाटतात. घरात या दिवशी वरई भाजून त्याचे पिठ तयार करून त्यापासून कोंडी हा पदार्थ बनवतात. पारंपारिक पध्दतीने नागदेवतेचे पूजन व कोंडीचा नैवेद्य देत घरातील लहानथोरांचे रक्षण कर अशी प्रार्थना नागदेवाला केली जाते. त्या प्रमाणे अतिशय साधे पणाने व घरातच नागपंचमी साजरी करण्यात आली.