पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काकांची हेल्मेट जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 06:00 PM2019-05-14T18:00:19+5:302019-05-14T18:02:00+5:30
नाशिक : रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरात हेल्मेट सक्तीची मोहीम व्यापक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात दुचाकी ...
नाशिक : रस्त्यावरील अपघात रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी शहरात हेल्मेट सक्तीची मोहीम व्यापक केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शहरात दुचाकी वाहनधारकांना हेल्मेटविषयी विचारणा केली जात असून, हेल्मेट परिधान न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे, तर जे हेल्मेट वापरत आहेत त्यांना कृतज्ञतापूर्वक गुलाबपुष्प देऊन सन्मानितही केले जात आहे. सुमारे ५०० पोलीस या मोहिमेसाठी रस्त्यावर उतरले असताना त्यांच्या मदतीसाठी ज्येष्ठ नागरिक श्याम कुलकर्णी हेदेखील खारीचा वाटा उचलत आहेत.
रस्त्यावर वाहनधारकांना अडविणाºया पोलिसांच्या बाजूलाच कुलकर्णी काका उभे राहतात आणि दुचाकी वाहन थांबले की ते ‘हेल्मेट ही सक्ती नाही, तुमची सुरक्षा आहे’, असा संदेश लिहिलेले स्टिकर दुचाकीला चिकटवितात. गेल्या दोन दिवसांत त्यांनी हजारो स्टिकर्सद्वारे हेल्मेट जनजागृती केली आहे.
शनिचिंतन ध्यान केंद्र चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून श्याम कुलकर्णी हे जनजागृतीचे काम करीत आहे. केवळ आता मोहीम सुरू आहे म्हणून नाही तर त्यांनी गेल्या दोन वर्षांपासून या मोहिमेला वाहून घेतले आहे.