महाकारुणी तथागताला बुद्ध पौणिर्मेनिमित्ताने त्रिवार वंदना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 06:22 PM2021-05-26T18:22:32+5:302021-05-26T18:25:31+5:30

नाशिक : बुद्ध पौणिर्मेनिमित्ताने शहर परिसरात सामुहिक बुद्ध वंदना घेत महाकारुणी तथागताला वंदन करण्यात आले तर बुध्द स्मारकात भिख्यु ...

nahsik,tribute,to,mahakaruni,tathagata,threevar! | महाकारुणी तथागताला बुद्ध पौणिर्मेनिमित्ताने त्रिवार वंदना !

महाकारुणी तथागताला बुद्ध पौणिर्मेनिमित्ताने त्रिवार वंदना !

googlenewsNext
ठळक मुद्देबुद्ध पाौर्णिमा : घरोघरी बुद्धवंदनेसह पुष्प अर्पण



नाशिक: बुद्ध पौणिर्मेनिमित्ताने शहर परिसरात सामुहिक बुद्ध वंदना घेत महाकारुणी तथागताला वंदन करण्यात आले तर बुध्द स्मारकात भिख्यु संघाच्यावतीने महापरित्राणं पाठ करण्यात आला. बुद्ध विहारांमध्येही सकाळच्या सुमारास मंगलमय वातावरणात बुद्धवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. घरोघरी भगवान गौतम बुद्धांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यंदा कोरोनामुळे अत्यंत साधेपणाने स्मारकात बुद्ध पौणॅिमा साजरी करण्यात आली.
तथागत गौतम बुद्ध यांच्या २५६५ जयंतीनिमित्ताने शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने त्रीरश्मी बुद्ध लेणी येथे मोजक्याच भिख्यु आणि उपासकांच्या उपस्थितीत बुद्ध पौर्णिमा कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आले होते. कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे नियमांचे पालन करीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विश्वशांती करीता बुद्ध स्मारकात नाशिक भिख्युसंघाच्यावतीने महापरित्राण पाठ करण्यात आला. यावेळी परिसरात बोधीवृक्षाचे रोपण करण्यात आले.   भिख्युसंघाचे नागधम्मो महास्थवीर, शांतीदूत चॅरिटेबल ट्रस्टचे भदन्त सुगत, भदन्द आर्यनाग, भदन्त धम्मरक्षित, भदन्त कश्यप, भदन्त संघराज, भदन्त धम्मरत्न, भदन्त धम्मआनंद, भदन्त् दिपांकर, भदन्त धम्मदर्शन आदि उपस्थितीत होते. या कार्यक्रमप्रसंगी परिसरातील उपासक, उपासिकांनी बुद्धस्मारकात जाऊन मूर्तीला वंदन केले. यंदा येथे सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली असल्याने दरवर्षी होणारी गर्दी झाली नाही.

Web Title: nahsik,tribute,to,mahakaruni,tathagata,threevar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.