पावसाळ्याच्या तोंडावर दहा तालुक्यात टँकरद्वारे पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 03:47 PM2021-06-04T15:47:24+5:302021-06-04T15:50:07+5:30
नदी,नाले आटले तर विहीरींनी तळ गाठळ्याने अनेक गावांमधून टँकरची मागणी होऊ लागली. तालुका पातळीवरून टँकर्स सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने जिल्ह्यात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर टँकर्स सुरू करण्याची वेळ आली.
टंचाईच्या झळा: येवला, सुरगाण्यात सर्वाधिक टँकर्स सुरूनाशिक: मागील वर्षी मुबलक पाऊस होऊनही जिल्ह्यातील ७२ गावांना पाणी टंचाई जाणवत असल्याने पावसाळ्याच्या तोंडावर या गावांना टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. सद्यस्थितीत दहा तालुक्यांमध्ये ५६ टँकर्सदवारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे. शुक्रवारी बागलाणमध्ये एक टँकर सुरू करण्यात आला.
मागील मोसमात जिल्ह्यावर वरुणराजचीकृपादृष्टी बरसल्याने जिल्ह्यातील धरणे भरली होती. त्यामुळे नदी, नाले, विहिरींच्या पाण्याची पातळी देखील वाढल्याने यंदा टचाईच्या झळा बसणार नाही अशी शक्यता वर्तविली जात होती. परंतु मे महिन्यातील पंधरवड्यानंतर विहीरींनी तळ गाठळ्याने जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू झाली. तीव्र उन्हामुळे टंचाईत अधिक भर पडल्याने पाण्यासाठी वणवण सुरू झाली.
नदी,नाले आटले तर विहीरींनी तळ गाठळ्याने अनेक गावांमधून टँकरची मागणी होऊ लागली. तालुका पातळीवरून टँकर्स सुरू करण्याचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाल्याने जिल्ह्यात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर टँकर्स सुरू करण्याची वेळ आली. मागील महिन्यात सुरू करण्यात आलेल्या टँकर्सच संख्येत ाय महिन्यात चार ने वाढली असून एकुण टँकर्सची संख्या ५६ इतकी झाली आहे.
सध्या टँकर्स सुरू करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये येवला आणि सुरगाण्यामध्ये सर्वाधिक टँकसे सुरू आहेत. सुरगाण्यात १२ गावांमध्ये सध्या टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पेठ आणि चांदवड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी ८ याप्रमाणे टँकर्स सुरू आहेत.
जिल्ह्यात सध्या बागलाण, चांदवड, देवळा,मालेगाव, नांदगाव,पेठ, सुरगाणा, त्र्यंबक,येवला या तालुक्यांमधील ७२ गावे ५१ वाडे यांना एकुण ५६ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.