नायगाव रस्ता वाहतुकीसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 09:07 PM2020-04-18T21:07:04+5:302020-04-19T00:40:31+5:30

नायगाव : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा सिन्नर-नायगाव हा रस्ता मंगळवारी दुपारनंतर अज्ञात व्यक्तींनी झाडे टाकून वाहतुकीसाठी बंद केला होता. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध करताच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने अत्यावश्यक माल वाहतूकदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

 Naigaon Road open for traffic | नायगाव रस्ता वाहतुकीसाठी खुला

नायगाव रस्ता वाहतुकीसाठी खुला

Next

नायगाव : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा सिन्नर-नायगाव हा रस्ता मंगळवारी दुपारनंतर अज्ञात व्यक्तींनी झाडे टाकून वाहतुकीसाठी बंद केला होता. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध करताच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने अत्यावश्यक माल वाहतूकदारांनी समाधान व्यक्त केले आहे.  केंद्रासह राज्य शासनाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर सर्वत्र सतर्कता बाळगली जात आहे. अनेक गावांत कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून गावाच्या वेशी बंद केल्या जात आहे. अशा वातावरणात संसर्ग रोखण्याच्या नावाखाली सिन्नर- नायगाव-सायखेडा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर मापरवाडी परिसरात अज्ञात लोकांनी चार ठिकाणी मोठ मोठी झाडे रस्त्यावर आडवी टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. मंगळवारी ( दि.१४ ) दुपारनंतर अचानक हा रस्ता बंद झाल्याने भाजीपाला, दूध आदीसह अनेक अत्यावश्यक मालाची वाहतूक करणाºया तसेच दवाखान्यात जाणाऱ्यांना माळेगाव एमआयडीसी या पर्यायी मार्गाने तालुक्याच्या गावी जावे लागले.
दरम्यान अत्यावश्यक सेवांना बाधा या मथळ्याने दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता बंद असे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी ( दि.१५) प्रसिद्ध करताच दुपारनंतर शासकीय
यंत्रणेमार्फत या रस्त्यावरील झाडे व काचा बाजूला सारून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
त्यामुळे भाजीपाला, दूध आदींसह अन्य अत्यावश्यक सेवा पुरविणारी वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनचालकांबरोबर सर्वसामान्य नागरिक समाधान व्यक्त करीत
आहे.

Web Title:  Naigaon Road open for traffic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक