नायगाव शिवराज्यभिषक दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2021 12:49 AM2021-06-08T00:49:45+5:302021-06-08T00:50:32+5:30
नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खो-यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्यभिषक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नायगाव : सिन्नर तालुक्यातील नायगाव खो-यातील सर्वच ग्रामपंचायत कार्यालयात शिवराज्यभिषक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
नायगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात स्वराज्यगुडी उभारण्यात आली.सरपंच मनिषा कदम यांच्या हस्ते स्वराज्यगुडीचे पुजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच भाऊसाहेब सांगळे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय बन, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
जायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने स्वराज्यगुडी उभारण्यात आली होती. सरपंच शालिनी दौंड यांच्या हस्ते भगवा ध्वज व गुडीचे पुजन तर उपसरपंच दत्ता दिघोळे यांच्या हस्ते शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनींनी विविध गीत सादर केले. यावेळी ग्रामसेवक आर. टी. सांगळेआदी उपस्थित होते.
देशवंडी येथे सरपंच दत्ताराम डोमाडे यांच्या हस्ते भगव्या ध्वजासह स्वराज्यगुडीचे पुजन करण्यात आले. यावेळी पोलिस पाटील मुकेश कापडी यांनी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन केले. या कार्यक्रमास पंचायत समितीच्या माजी सदस्य सोनल कर्डक, नवनाथ कापडी, सुभाष बर्के, भाऊराव कापडी, प्रविण कर्डक आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
ब्राम्हणवाडे ग्रामपंचायतीच्या वतीने भगवानबाबा मंदिराच्या प्रांगणात सरपंच कैलास गिते यांनी ध्वज व स्वराज्यगुडीचे पुजन केले.
यावेळी ग्रामविकास अधिकारी गजानन वटाणे, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.