नाकोडा वसतिगृह बनले समस्यांचे आगर

By admin | Published: February 1, 2016 11:01 PM2016-02-01T23:01:11+5:302016-02-01T23:15:21+5:30

शैक्षणिक सुविधांपासून वंचित : निकृष्ट दर्जाचे जेवण; ग्रंथालय, व्यायामशाळेचा बोजवारा

Nakoda became the hostel of the problem | नाकोडा वसतिगृह बनले समस्यांचे आगर

नाकोडा वसतिगृह बनले समस्यांचे आगर

Next

मनोज देवरे कळवण
कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असलेल्या नाकोडा येथील शासकीय वसतिगृह अक्षरश: समस्यांचे आगरच बनले असून, शासकीय आश्रमशाळा व वसतिगृहातील अनागोंदी कारभार, विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अपूर्ण शैक्षणिक सुविधा, निकृष्ट दर्जाचे जेवण, अस्वच्छता, शालेय साहित्य, शिष्यवृत्ती, ग्रंथालय, व्यायामशाळा निर्वाह भत्ता आदि समस्या समोर आल्या आहेत.
नाकोडा येथील मुलांच्या वसतिगृहात विद्यार्थी प्रवेशाची संख्या २५० असताना या ३४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. परिसरात दुर्गंधी पसरली असून, परिसर स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष होते, अशी विद्यार्थ्यांची तक्र ार आहे. बऱ्याचवेळा तर विद्यार्थी स्वत:च स्वच्छता करून घेतात. स्वच्छतागृहातदेखील दुर्गंधी असून, त्यालगत निवासस्थानाची व्यवस्था असल्याने दुर्गंधीयुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना राहावे लागत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. माजी मंत्री ए. टी. पवार यांनी या वसतिगृहाची इमारत बांधून एक आदर्शवत मॉडेल तयार केले. ६ कोटींची नाकोडा वसतिगृहाची इमारत असून, व्यायामशाळा, ग्रंथालय, निवासव्यवस्था, स्वच्छतागृह, धोबीघाट, भोजन, स्वयंपाक कक्ष, गृहपाल आदि व्यवस्था करण्यात आली आहे .

Web Title: Nakoda became the hostel of the problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.