हवीशी वाटणारीच झाली ‘नकोशी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:14 AM2021-02-07T04:14:21+5:302021-02-07T04:14:21+5:30

याबाबत अधिक माहिती अशी, रविंद्र रामचंद्र पवार हे नेहमीप्रमाणे सकाळी पाळीव श्वानासोबत फेरफटका मारत होते. यावेळी बाळाच्या रडण्याचा आवाज ...

'Nakoshi' | हवीशी वाटणारीच झाली ‘नकोशी’

हवीशी वाटणारीच झाली ‘नकोशी’

Next

याबाबत अधिक माहिती अशी, रविंद्र रामचंद्र पवार हे नेहमीप्रमाणे सकाळी पाळीव श्वानासोबत फेरफटका मारत होते. यावेळी बाळाच्या रडण्याचा आवाज अचानकपणे त्यांच्या कानी पडला आणि पवार यांची पावले जागीच थबकली. जंगलाच्या निर्जन परिसरात नेमके बाळ रडतेय कोठे? म्हणून त्यांनी आजुबाजुला नजर टाकून धुंदाळण्याचा प्रयत्न केला असता एका प्लॅस्टिकच्या गोणीत कापडामध्ये गुंडाळलेले बाळ त्यांच्या नजरेस पडले. त्यांनी त्वरित बाळाला गोणीतून बाहेर काढत प्राणवायु सहज मिळेल अशी तजवीज केली आणि मदतीसाठी जवळच्या एका मित्राशी संपर्क साधला. या नवजात शिशुला उपचारासाठी त्वरित या दोघांनी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.डॉक्टरांनी बाळाची तपासणी करत प्रकृती उत्तम असल्याचे सांगितले. बाळाचे वजन दोन किलो ७०० ग्रॅम असून बाळाला आवश्यक ते डोसदेखील पाजण्यात आले. घटनेची माहिती मिळताच सातपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी रुग्णालयात धाव घेतली. मोरे यांनी या चिमुकलीचे नाव शंकुतला असे ठेवले आहे. या चिमुकलीला जन्म देणाऱ्या ‘वैरिणी’ मातेविरुध्द गंगापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल आहे.

--इन्फो---

दत्तक घेण्याची दाम्पत्याची इच्छा

बेवारसपणे वाऱ्यावर नवजात शिशुला मृत्युच्या दाढेत पोहचविण्यासाठी सोडून देत पळ काढणाऱ्या जन्मादात्यांमुळे आई-वडिलांच्या नात्यालाही काळीमा फासली गेली आहे.

गंगासागरनगर परिसरात राहणाऱ्या भाग्यश्री विलास तकाटे व विलास तकाटे या दाम्पत्याने या चिमुकलीला दत्तक घेण्याची इच्छाही व्यक्त केली आहे.

Web Title: 'Nakoshi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.