महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नकोशीचे वाचविले प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 11:26 PM2020-03-07T23:26:41+5:302020-03-07T23:27:16+5:30

दिंडोरी : ‘बेटी बढाव बेटी बचाव’चे कितीही नारे देत असले तरी अजूनही स्त्री जन्माला लागलेले ग्रहण काही सुटताना दिसत नाही. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एक अज्ञात निष्ठुर मातेने जन्माला घातलेल्या आपल्या नकोशीला उसाच्या शेताच्या बांधावर टाकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीचे दैव बलवत्तर म्हणून ती वाचली असून तिला ऊसतोड कामगारांनी सुखरूपपणे दवाखान्यात नेत जीवदान दिले आहे.

Nakoshi's rescued soul on the eve of Women's Day | महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नकोशीचे वाचविले प्राण

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नकोशीचे वाचविले प्राण

Next
ठळक मुद्देअवनखेड शिवारात आढळले अर्भक । अभागी चिमुरडीचा काळ आला होता; पण वेळ नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
दिंडोरी : ‘बेटी बढाव बेटी बचाव’चे कितीही नारे देत असले तरी अजूनही स्त्री जन्माला लागलेले ग्रहण काही सुटताना दिसत नाही. जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एक अज्ञात निष्ठुर मातेने जन्माला घातलेल्या आपल्या नकोशीला उसाच्या शेताच्या बांधावर टाकून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलीचे दैव बलवत्तर म्हणून ती वाचली असून तिला ऊसतोड कामगारांनी सुखरूपपणे दवाखान्यात नेत जीवदान दिले आहे.
तालुक्यातील अवनखेड शिवारात कादवा नदीलगत अज्ञात इसमाने स्री जातीचे एक दिवसाचे बालक झाडाच्या अडचणीत टाकून त्यावर कागद टाकून पलायन केले. शेजारी सागर जाधव यांची ऊसतोड चालू होती, येथील मजुरांनी बालकाचा रडण्याचा आवाज ऐकला आणि त्या बालकाला बाहेर आणून ऊस मालकाच्या स्वाधीन केले. ही घटना समजताच परिसरातील शेतकरी धावून आले. त्यांनी घटनेची माहिती पोलीसपाटील सतीश निकम व सरपंच नरेंद्र जाधव यांना दिली सरपंच जाधव यांनी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी आल्यानंतर त्या अर्भकाला तत्काळ दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात आणले, अर्भकाची प्रकृती व्यवस्थित असल्याचे समजते.
त्यानंतर दिंडोरीचे पोलीस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांनी घटनास्थळाची पाहणी करत पंचनामा केला, पुढील तपास पोलिस हवालदार जाधव ,भोये करत आहे.रविवारी (दि़८) सर्वत्र जागतिक महिला दिन साजरा केला जाणार आहे़ त्याच्या पूर्वसंध्येलाच एका नवजात चिमुरडीचा प्राण वाचविण्यात शेतकऱ्यांना यश आले़ या घटनेनंतर पंचक्रोशीत सदर नकोशीची चर्चा सुरू झाली आणि संबंधित मातेबद्दलही संतापाचा सूर उमटला़ चिमुरडीच्या रडण्याच्या आवाजामुळे शेतकऱ्यांना तिचा माग घेता आला़

Web Title: Nakoshi's rescued soul on the eve of Women's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.