सिडकोतील नाले यंदा सफाईविनाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:12 AM2021-06-04T04:12:33+5:302021-06-04T04:12:33+5:30
महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी नाशिक शहरातील सर्वच भागातील उघडे नाले, गटारी, नैसर्गिक नाले साफसफाईची मोहीम हाती घेतले ...
महापालिकेच्या वतीने दरवर्षी पावसाळा सुरू होण्याआधी नाशिक शहरातील सर्वच भागातील उघडे नाले, गटारी, नैसर्गिक नाले साफसफाईची मोहीम हाती घेतले जाते परंतु यंदाच्या वर्षी जून महिना सुरू होऊनही अद्यापर्यंत मनपाच्या सिडको विभागाच्यावतीने नैसर्गिक नाले साफसफाई केली नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सिडको भागात उत्तमनगर, पंडितनगर, शिवशक्ती चौक, तोरणानगर, अंबड आदी भागांमध्ये नैसर्गिक नाले आहेत. सदरचे नाले हे नागरी वस्तीतून जात असल्याने तसेच हे सर्व नाले उघडे असल्याने यात मोठ्या प्रमाणात घाण कचरा साचून परिसरात दुर्गंधी पसरते. उघडे नाल्यातील घाण व कचरा नियमित साफ होणे गरजेचे असतानाही ते साफ केले जात नाहीच. परंतु पावसाळा सुरू होण्याआधी तरी त्यातला घाण व कचरा काढणे गरजेचे आहे. यामुळे परिसरात डासांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले असून मनपाने याबाबत त्वरित दखल घेत सिडको व अंबड भागातील नागरी वस्ती सह इतर ठिकाणी जाणाऱ्या सर्व आले तसेच गटारी त्वरित साफ करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात
चौकट===
आधीच कोरोना महामारीमुळे नागरिक त्रस्त आहे. यातच येत्या काही दिवसांत पावसाळा सुरू होत असल्याने नाल्यातील घाण व कचरा साफ करणे ही मनपाची जबाबदारी असतानाही त्याकडे डोळेझाक केली जात आहे. नाल्यातील दुर्गंधीमुळे परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
(फोटो ०३ नाला)