इगतपुरीत नालेसफाई सुरू, रस्त्यांचे खड्डे ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:11 AM2021-05-31T04:11:24+5:302021-05-31T04:11:24+5:30
इगतपुरी शहर हे पावसाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. दिवसभरात शंभर ते दीडशे मिलिमीटर पावसाची नोंद होते. ...
इगतपुरी शहर हे पावसाचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. दिवसभरात शंभर ते दीडशे मिलिमीटर पावसाची नोंद होते. त्यात पावसाळ्यात गटारे व नाल्यांत कचरा अडकल्याने घरामध्ये पाणी शिरू नये, यासाठी इगतपुरी नगर परिषदेने नालेसफाईची मोहीम हाती घेतली आहे.
मात्र, नालेसफाईची कामे चालू असताना शहरातील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांविषयी कुठेही डागडुजी होताना दिसत नाही. याचा मोठा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
इगतपुरी शहराला जोडणारे मोठे मुख्य सहा नाले असून त्यांना जवळपास ३०० छोटे नाले जोडलेले आहेत. त्यांचीही टप्प्याटप्प्याने साफसफाईची कामे इगतपुरी नगर परिषदेच्या निधीतून केली जात आहेत. यंदा तीन लाख रुपयांपर्यंतचा खर्च नालेसफाईसाठी लागणार असल्याचे नगर परिषदेकडून सांगण्यात आले. इगतपुरी शहरात अनेक धोकादायक इमारती व घरे असून नगर परिषदेने त्यांना जाहीर नोटिसाही बजावल्या आहेत. इगतपुरीत पावसाळ्यात मुसळधार चार महिने पाऊस पडतो. या धोकादायक घरे, इमारतींची पडझड होऊ नये, यासाठी सहा इमारतमालकांना नगर परिषद प्रशासनाने नोटिसा बजावल्या असल्याचे शहर अभियंता पी.वाय. जुन्नरे यांनी सांगितले.
इन्फो
पाणीपुरवठा योजना रखडली
कोरोनाकाळात सलग दुसऱ्या लाटेमुळे
इगतपुरी शहराला मुख्य चोवीस तास पाणीपुरवठा करणारी ३२ कोटींची योजना अद्यापही दोन वर्षांपासून अपूर्ण असून जवळपास १५ कोटींचे अर्धे काम झाले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा मजूर गावी गेल्याने तुटवडा जाणवत असून योजना रखडली आहे.
शहरातील आतापर्यंत धोबी गल्ली, सरदार वल्लभभाई पटेल चौक, शिवाजी चौक, भजनी मठ, शनी मंदिर, भाजी मार्केट, बजरंगवाडा, आदी
नाल्यांच्या साफसफाईचे काम नगर परिषदेने युद्धपातळीवर हाती घेतले आहे.
कोट....
इगतपुरी शहरात मुसळधार पाऊस पडतो. पावसाळ्यात घरांमध्ये पाणी घुसू नये, यासाठी नगर परिषदेच्या वतीने मोठ्या व छोट्या नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असून धोकादायक इमारतींनाही नोटिसा बजावल्या आहेत.
- पंकज गोसावी, मुख्याधिकारी, इगतपुरी नगर परिषद
फोटो - ३० इगतपुरी नगरपरिषद-१
इगतपुरी नगर परिषदेच्या वतीने सुरू असलेले नालेसफाईचे काम.
===Photopath===
300521\30nsk_11_30052021_13.jpg
===Caption===
फोटो - ३० इगतपुरी नगरपरिषद-१इगतपुरी नगरपरिषदेच्यावतीने सुरू असलेले नालेसफाईचे काम.