पावसासाठी मालेगावी तीन दिवस नमाजपठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 06:05 PM2018-08-07T18:05:11+5:302018-08-07T18:06:22+5:30
मालेगाव : राज्यात सर्वत्र पाऊस बरसत असताना मालेगाव तालुक्याकडे पावसाने वक्रदृष्टी केली आहे. यामुळे शेतकरी चिंतित असून, शहरातील मुस्लीम बांधवांनी इदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण करून वरुणराजास साकडे घातले. सलग तीन दिवस नमाजपठण करण्यात येणार आहे.
मालेगाव : राज्यात सर्वत्र पाऊस बरसत असताना मालेगाव तालुक्याकडे पावसाने वक्रदृष्टी केली आहे. यामुळे शेतकरी चिंतित असून, शहरातील मुस्लीम बांधवांनी इदगाह मैदानावर सामूहिक नमाजपठण करून वरुणराजास साकडे घातले. सलग तीन दिवस नमाजपठण करण्यात येणार आहे.
पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले. तुरळक पावसाच्या सरी वगळता तालुक्यात कुठेही जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली नाही. शेतकऱ्यांनी अत्यल्प पावसावरच खरीप पिकाच्या पेरण्या केल्या; परंतु नंतर पाऊसच नसल्याने खरिपाची पिके करपू लागली असून, दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. काही विहिरींनी तळ गाठला आहे. काही गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जनावरांच्या चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. भविष्यात जोरदार पाऊस न आल्यास तालुक्याचा प्रश्न आणखी उग्र होणार आहे.
मालेगावी इदगाह मैदानावर सकाळी १० वाजेच्या सुमारास पावसासाठी मुस्लीम बांधवांतर्फे नमाजपठण करण्यात आले. मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माइल यांनी दुवापठण करून वरुणराजाला साकडे घातले.
नमाजपठणानंतर परिसरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. त्यामुळे काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शहर वाहतूक शाखेने मोसम पूल चौकात काही काळ रस्ते अडवून वाहतूक सुरळीत केली.
रस्ते गर्दीने फुलले
इदगाह मैदानावर सकाळी १० वाजेच्या सुमारास पावसासाठी मुस्लीम बांधवांतर्फे नमाजपठण करण्यात आले. मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माइल यांनी दुवापठण करून वरुणराजाला साकडे घातले. नमाजपठणानंतर परिसरातील रस्ते गर्दीने फुलून गेले होते. त्यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शहर वाहतूक शाखेने मोसम पूल चौकातील रस्ते काही काळ अडवून वाहतूक सुरळीत केली.