दुर्गम भागातील धार्डेदिगर अंगणवाडी चे राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामाकंन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 04:16 PM2018-10-01T16:16:43+5:302018-10-01T16:17:32+5:30
कळवण : धार्डेदिगर सारख्या अतिदुर्गम भागात कुपोषण मुक्तीसाठी केलेले काम कौतुकास्पद असुन राष्ट्रीय पुरस्कारासाठी अंगणवाडीचे नामांकन झाल्याने त्यांचा आदर्श इतरही अंगणवाडीने घेऊन तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचवावे असे आवाहन धार्डेदिगर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य व माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी केले आहे.
कळवण : धार्डेदिगर सारख्या अतिदुर्गम भागात कुपोषण मुक्तीसाठी केलेले काम कौतुकास्पद असुन राष्ट्रीय पुरस्कारासाठी अंगणवाडीचे नामांकन झाल्याने त्यांचा आदर्श इतरही अंगणवाडीने घेऊन तालुक्याचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोहचवावे असे आवाहन धार्डेदिगर गटाच्या जिल्हा परिषद सदस्य व माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी केले आहे.
कळवण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील धार्डेदिगर येथील अंगणवाडीत उत्कृष्ट पोषण आहार महासप्ताह साजरा करण्यात आला. त्यावेळी व्यासपीठावरून त्या बोलत होत्या . पोषण आहारा निमित्ताने गावात घरोघर गुढ्या उभारण्यात आल्याने व पोषण रथ पारपांरीक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. कार्यक्र माला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, पंचायत समितीचे सभापती लालजी जाधव, महिला व बालविकासचे प्रकल्प अधिकारी एस. बी. शिंदे, सरपंच ललीता जाधव उपस्थित होते.
१ ते ३० आॅक्टोंबर सप्टेंबर हा महिना राष्ट्रीय पोषण आहार कार्यक्र म म्हणून संपुर्ण राज्यात साजरा करण्यात येत असुन यात कुपोषण मुक्तीसाठी ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना उत्कृष्ट पोषण आहार व जनजागृती व्हावी यासाठी विशेष कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धार्डेदिगर येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांनी पोषण आहार, पालेभाज्या व कडधान्ये यांचे महत्व वेगवेगळ्या नाटकांद्वारे ग्रामस्थांना समजावून सांगितले
अंगणवाडी सेविका अंजना गांगुर्डे यांनी शासकीय निकषाप्रमाणे पोषण आहाराचे वितरण करु न कुपोषित बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणल्याने त्याच्या कार्याची दखल घेत राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांच्या नावाचे नामांकन पाठवण्यात आल्याचे प्रकल्प अधिकारी शिंदे यांनी सांगितले.
याप्रसंगी वेगवेगळ्या पद्धतीचे पोषण आहार व आरोग्यदायी पालेभाज्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. उत्कृष्ट रांगोळीही काढण्यात आली होती. तसेच कुपोषीत बालकांच्या पालकांना अंडी देणारी प्रत्येकी दोन दोन कोंबडी वाटप करण्यात आले.
यावेळी विस्तार अधिकारी एस. डी. महाले, प्रकल्पचे राजेंद्र मोरे, एस. डी कांगणे, मुख्यसेविका श्रीमती बी. पी सावकार, के. डी गौतम, प्राथमिक शिक्षक यु. बी. गावित, दिपक जगताप, ग्रामसेवक के. पी. सुर्यवंशी काशीनाथ बहिरम, शांताराम बहिरम, कैलास बहिरम, पोपट बहिरम, दिपक देशमुख, त्र्यंबक ठाकरे, निवृती बहिरम, बापु जगताप, शांताराम ठाकरे, विठ्ठल माळी, सुनिता देशमुख यांच्यासह प्रकल्प दोन मधील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनिस व ग्रामस्थ उपस्थितीत होते.
चौकट --- गरोदर काळात नियमति अमृत आहार घेतल्याने माझी प्रसुती साधारण झाली व माङया नवजात बालकाचे चांगल्या प्रकारे पोषण झाल्याने बालक सदृड आहे - अनिता गायकवाड, स्तनदा माता, धार्डेदिगर.