निकालपत्रकावर वडिलांबरोबरच आईचेही नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 03:54 PM2019-05-03T15:54:58+5:302019-05-03T15:55:20+5:30
फांगदर शाळेचा उपक्रम : विद्यार्थ्यांना आकर्षक संगणकीय प्रत
दिनकर आहेर, खामखेडा : फांगदर, ता. देवळा येथील प्राथमिक शाळेने या वर्षी विद्यार्थ्यांना संगणकीय रंगीत निकालपत्रिका देत त्यावर वडिलांच्या नावाबरोबरच आईचे नाव देखील समाविष्ट केले. शाळेच्या या उपक्रमाचे पालकांनी स्वागत करत कौतुक केले. असा अभिनव उपक्र म राबवणारी फांगदर शाळा जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली आहे.
शिक्षण क्षेत्रात निकालपत्रकांना अनन्य साधारण महत्व असते. ह्या पदव्यांना प्रत्येक जण जीवापाड जपत असतो. त्याच पद्धतीने शालेय जीवनातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षणातील निकालपत्रक देखील अनेक विद्यार्थी आपल्याकडे जपून ठेवत असतात. त्यामुळेच खामखेडा ता. देवळा येथील येथील फांगदर प्राथमिक शाळेने चालू वर्षी विद्यार्थ्यांना संगणकीय निकालाची प्रत देत महाराष्ट् दिनी विद्यार्थ्यांना पालकांच्या उपस्थितीत वाटप केली. शाळेचे शिक्षक खंडु मोरे यांनी विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी आपल्या शालेय जीवनातील निकालपत्रक सांभाळता येईल यासाठी अतिशय आकर्षक पद्धतीने रंगीत निकालपत्रक तयार केले.
वेगळेपणा आला
निकालाच्या सर्वच बाबी ह्या संगणकाच्या मदतीने तयार करण्याने शिक्षकाचे मुल्यमापन/रेकॉर्ड तयार करण्याला वर्षभरातला ऐंशी टक्क्याहून अधिक वेळ व श्रम वाचतो. निकाल पत्रकात सुटसुटीतपणा,अचूकता,एकसारखेपणा,वेगळेपणा आला.
- संजय गुंजाळ, मुख्याध्यापक