नानांच्या नावे नगरसेवकांना ठणाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:11 AM2021-07-24T04:11:38+5:302021-07-24T04:11:38+5:30
रस्ताच काय नारळही फोडू देणार नाही... स्मार्ट सिटीने गावठाणातील रस्ते फोडल्याचे प्रकरण बरेच गाजले. काही नगरसेवकांनी त्यास विरोध केला. ...
रस्ताच काय नारळही फोडू देणार नाही...
स्मार्ट सिटीने गावठाणातील रस्ते फोडल्याचे प्रकरण बरेच गाजले. काही नगरसेवकांनी त्यास विरोध केला. मात्र, वरकरणी विरोध मात्र आतून रस्ते फोडण्याच्या कामाचे समर्थन करणारेही काही नगरसेवक हेातेच. गावठाणातील एक रस्ता फोडून दिल्यानंतर एका नगरसेवकाने आवाज उठवायला सुरूवात केली. दुसऱ्याने तर शांतपणे भूमिपूजनाचा कार्यक्रम एमजी रोडवर ठेवला. तोही रात्रीच्या निरव शांततेत गुपचूप. म्हणजे नागरीकांना कळायलाच नको. मात्र, अशाप्रकारे रस्ते फोडण्यास विरोध असलेल्या दुसऱ्या राजकीय नेत्याला ही खबर लागली. त्याने रोडच काय परंतु नारळ सुध्दा फोडू देणार नाही असा निरोप पाठवून रात्रीच तेथे चाल करण्याचे नियोजन केले. हा प्रकार कळताच त्या नगरसेवकाने आपला कार्यक्रम बदलला आणि मग कार्यक्रमच रद्द झाला.
- संजय पाठक