नाशिकच्या नागरिकांचे नाव मालेगावच्या यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:15 AM2021-05-06T04:15:05+5:302021-05-06T04:15:05+5:30

राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करण्यावर भर दिला आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण यापूर्वी सुरू करण्यात आले ...

Name of Nashik citizens in Malegaon list | नाशिकच्या नागरिकांचे नाव मालेगावच्या यादीत

नाशिकच्या नागरिकांचे नाव मालेगावच्या यादीत

Next

राज्य शासनाने कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण करण्यावर भर दिला आहे. ४५ वर्षांपुढील नागरिकांचे लसीकरण यापूर्वी सुरू करण्यात आले आहे. आता १८ वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण केले जात आहे. ज्येष्ठांच्या लसीकरणासाठी शहरात १७ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. तर १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींचे लसीकरण शहरातील निमा- २ केंद्रावर केले जात आहे. नाव नोंदणी करून कन्फर्मेशन येणाऱ्या व्यक्तींनाच लसीकरण केले जात आहे. लसीकरणाच्या पहिल्या दिवशी १०० जणांना लस दिली जाणार होती. मात्र, नोंदणी केलेल्या नावांच्या यादीत नाशिक शहरातील ८६ जणांचा समावेश होता. ऑनलाईन केंद्र निवडताना झालेल्या गोंधळामुळे हा प्रकार घडला. ही बाब लक्षात आल्याने महापालिका हद्दीतील १४ जणांचे लसीकरण करण्यात आले. महापालिकेला सध्या २ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. लसींच्या उपलब्धतेनुसार नियोजन करण्यात आले आहे. एका दिवसाला दीडशे जणांचे लसीकरण केले जाणार आहे. आरोग्य विभागाने निश्चित केलेल्या वार व वेळेनुसार नागरिकांनी लसीकरणासाठी निमा- २ केंद्रावर उपस्थित रहावे, असे आवाहन महापालिकेच्या प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. ममता लोथे यांनी केले आहे.

चौकट :

आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण

पहिल्या टप्प्यात आरोग्य व शासकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. २ हजार ५४८ आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली आहे. यातील १ हजार ६४६ कर्मचाऱ्यांचे दुसरे लसीकरण झाले आहे. शासकीय २ हजार २५४ कर्मचाऱ्यांनी पहिला डोस घेतला असून १ हजार ३४५ कर्मचाऱ्यांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. ६० वर्षांवरील ८ हजार ८९३ ज्येष्ठ नागरिकांचा पहिला डोस तर २ हजार ९८७ नागरिकांना दोन्ही डोस दिले गेले आहेत. ४५ ते ६० वयोगटातील ९ हजार ६५५ जणांना पहिला व १ हजार २८१ जणांनी दोन्ही डोस घेतले आहे. एकूण १ लाख ६३ हजार ७८६ जणांपैकी २३ हजार ३६४ जणांनी पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ७ हजार २५९ इतकी आहे.

फोटो फाईल नेम : ०५ एमएमएवाय ०१ . जेपीजी

फोटो कॅप्शन : मालेगाव महापालिकेच्या निमा २ केंद्रावर १८ वर्षांवरील व्यक्तींनी लसीकरणासाठी रांग लावली होती.

===Photopath===

050521\05nsk_8_05052021_13.jpg

===Caption===

फोटो कॅप्शन बातमीसोबत दिले आहे.

Web Title: Name of Nashik citizens in Malegaon list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.