शिखर बॅँक अहवालात रोहित पवार यांचेही नाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 01:08 AM2019-10-17T01:08:55+5:302019-10-17T01:09:28+5:30
शिखर बॅँकेच्या ज्या घोटाळ्यात राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावांचा समावेश आहे, त्याच प्रकरणातील एका कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेत संचालक असलेल्या रोहित पवार यांच्या नावाचादेखील समावेश असल्याचे नाबार्ड, कॅग आणि रिझर्व्ह बॅँकेच्या अहवालात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे राष्टÑीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.
नाशिक : शिखर बॅँकेच्या ज्या घोटाळ्यात राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावांचा समावेश आहे, त्याच प्रकरणातील एका कारखान्याच्या खरेदी प्रक्रियेत संचालक असलेल्या रोहित पवार यांच्या नावाचादेखील समावेश असल्याचे नाबार्ड, कॅग आणि रिझर्व्ह बॅँकेच्या अहवालात असल्याचा गौप्यस्फोट भाजपचे राष्टÑीय उपाध्यक्ष किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत केला.
त्या संपूर्ण घोटाळ्याबाबत राज्य सरकारने समिती गठित करून दिलेल्या अहवालानुसार मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्या प्रकरणातील एका कारखाना खरेदी प्रकरणात संचालक असलेल्या रोहित पवार यांचे नावदेखील असल्याचे सोमय्या यांनी नमूद केले.
शिवसेनेला मानसन्मान न देता गृहीत धरले जाते का? या प्रश्नावर भूमिका मांडताना महायुतीमधील सर्व पक्षांना सन्मानाची वागणूक दिली जाते. मात्र, पंतप्रधान पदाबाबत काही प्रोटोकॉल पाळावे लागतात, असेही त्यांनी सांगितले.
राजीनाम्यामागील नाट्य बाहेर येईल
ईडीच्या अहवालात शरद पवार यांचे नाव आल्याने दु:ख झाल्याचे कारण सांगत अजित पवार यांनी राजीनामा दिल्याची चर्चा झाली. मात्र, या प्रकरणातील ईडीची चौकशी पूर्ण झाल्यानंतरच राजीनामा नाट्यामागील खरे नाट्यदेखील उलगडले जाईल, असे संकेतदेखील सोमय्या यांनी दिले.