महसूल कर्मचारी संघटना जाणार संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2020 12:58 AM2020-01-07T00:58:33+5:302020-01-07T00:59:34+5:30

नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्णातील सर्व महसूल कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Named Employees Association will go on strike | महसूल कर्मचारी संघटना जाणार संपावर

महसूल कर्मचारी संघटना जाणार संपावर

Next
ठळक मुद्देविविध मागण्या : निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर

नाशिक : केंद्राच्या कामगारविरोधी धोरणाला विरोध करण्याबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी पुकारण्यात आलेल्या संपात महसूल कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. या संदर्भात संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकाºयांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. जिल्ह्णातील सर्व महसूल कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
कामगारांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी कामगारांच्या विविध संघटनांच्या वतीने दि. ८ रोजी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी देशभरातील सर्व शासकीय विभागातील कर्मचारी संघटना सहभागी होणार आहे. नाशिक जिल्हा महसूल कर्मचारी संघटनादेखील संपात सहभागी असून, या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाºयांना निवेदन देण्यात आले आहे. जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार तालुक्यातील सर्व तहसीलदार या संपात सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे नागरे यांनी दिली. राजपत्रित अधिकाºयांचाही संपाला पाठिंबाआपल्या मागण्यांकडे केंद्र आणि राज्याचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील कर्मचाºयांनी संपाची हाक दिलेली आहे. कर्मचाºयांच्या रास्त मागण्या या अधिकाºयांच्याही जिव्हाळ्याच्या असल्यामुळे कर्मचाºयांच्या या मागण्यांना अधिकारी महासंघाचा पाठिंबा असल्याचे पत्रक महासंघाने जाहीर केले आहे. नवीन पेन्शन योजना, वेतनत्रुटी दूर करणे, सुधारित आश्वासित प्रगती योजना, ग्रेड पेची मर्यादा, पाच दिवसांचा आठवडा, सेवावृत्तीचे वय ६० वर्षे असावे, सर्व रिक्तपदे त्वरित भरण्यात यावीत, केंद्राप्रमाणेच महागाई भत्ता, विभागवार चक्राकर बदली पद्धतीतून महिला अधिकाºयांना वगळावे अशा मागण्या महासंघानेदेखील केल्या आहेत.

Web Title: Named Employees Association will go on strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.