जिल्ह्यात ४०० मतदारांची यादीतील नावे धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:44+5:302021-07-03T04:10:44+5:30

नाशिक: निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदार याद्या शुद्धीकरणाची मोहीम राबविण्यात येत असून येत्या ५ तारखेपर्यंत छायाचित्रांसाठीची मुदत आहे. मतदार ...

The names of 400 voters in the district are in danger | जिल्ह्यात ४०० मतदारांची यादीतील नावे धोक्यात

जिल्ह्यात ४०० मतदारांची यादीतील नावे धोक्यात

googlenewsNext

नाशिक: निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात मतदार याद्या शुद्धीकरणाची मोहीम राबविण्यात येत असून येत्या ५ तारखेपर्यंत छायाचित्रांसाठीची मुदत आहे. मतदार यादीत मतदारांची छायाचित्रे अनिवार्य करण्यात आल्यामुळे छायाचित्रांची कामे जिल्हा निवडणूक शाखेकडून युद्धपातळीवर सुरू असून अजूनही सुमारे ४०० मतदारांची छायाचित्रे प्रलंबित असल्याने येत्या ५ तारखेपर्यंत त्यांची छायाचित्रे मिळविण्यासाठीचे प्रयत्न केले जाणार आहे.

छायाचित्र मतदार यादीच्या मोहिमेसाठी राबविण्यात आलेल्या शुद्धीकरण उपक्रमांतर्गत आतापर्यंत ९८.८७ टक्के काम पूर्ण झाल्याची आकडेवारी देण्यात आली आहे. जवळपास सर्वच तालुक्यांमधील मतदार छायाचित्रांची कामे शंभर टक्के झाली असून, नाशिक पश्चिममध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत अधिक मतदार हे छायाचित्राविना आहेत.

--इन्फो--

विधानसभा एकूण मतदार छायाचित्रे नसलेले

मालेगाव (मध्य) ३,०६,६७६ २९४

कळवण २,६८,२३३ ४५

नाशिक (पश्चिम) ४,०९,२०९ ३५

इगतपुरी २,४९,९६९ २४

चांदवड २,८२,१२१ ०१

सिन्नर २,९६,९२९ ०१

नांदगाव ३,१३,२१३ ००

मालेगाव (बाह्य) ३,३६,५०३ ००

बगलाण २,७७,३६० ००

येवला २,९४,७१४ ००

निफाड २,७७,३१९ ००

दिंडोरी ३,०६,९४८ ००

नाशिक (पूर्व) ३,५४,६६१ ००

नाशिक (मध्य) ३,२०,०१५ ००

देवळाली २,६०,२५९ ००

--इन्फो--

जिल्ह्यातील एकूण मतदार : ४५,६४,१२९

स्त्री मतदार : २१,७८,४०५

पुरुष मतदार: २३,८५,६३६

छायाचित्र न दिलेले मतदार : ३५,३७१

--इन्फो--

छायाचित्र जमा करण्यासाठी मोहीम गतिमान होणार

मतदार यादीत मतदारांची छायाचित्रे अनिवार्य करण्यात आल्यामुळे जिल्ह्यात सातत्याने याबाबतची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मतदार यादी शुद्धीकरणाची माेहीम हाती घेण्यात आली तेव्हा ३५,३७१ मतदारांची छायाचित्रे यादीत नसल्याची बाब समोर आली होती. त्याअनुषंगाने बीएलओंच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मोहिमेनुसार ६,४१० मतदारांची छायाचित्रे मिळविण्यात यश आले आहे. परंतु २८,५६१ मतदारांची माहिती तसेच त्यांच्या पत्त्यावर ते आढळून आले नसल्याने त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यानुसार आता केवळ ४०० मतदारांची छायाचित्रे जमा करण्याची मोहीम राबविली जाणार आहे.

--इन्फो--

येथे जमा करा छायाचित्रे

१) शहरी भागातील मतदारांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या मतदार संघाच्या कक्षामध्ये जाऊन आपल्या मतदार यादीनुसार छायाचित्रे जमा करता येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात देवळाली, नाशिकमध्ये नाशिक पूर्व तसेच नाशिक पश्चिम या मतदारसंघांचा कक्ष असून तेथे छायाचित्र जमा करता येणार आहे.

२) ग्रामीण भागातील ज्या मतदारांनी अद्यापही छायाचित्र जमा केलेले नाही त्यांनी आपल्या तहसील कार्यालयात छायाचित्रे जमा करावी, असे आवाहन करण्यात आलेले आहे.

--कोट---

मतदार यादी शुद्धीकरणाची मोहीम सतत सुरू राहणारी प्रक्रिया असून बीएलओ तसेच मतदान शाखेतील कर्मचाऱ्यांना छायाचित्र मोहीम पूर्ण करण्यास सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९८ टक्के काम झाले असून उर्वरित काम आठ दिवसांच्या आत पूर्ण होणार आहे. छायाचित्र नसलेल्या मतदारांनी याबाबतची खात्री करून घेऊन मतदार संघनिहाय असलेल्या कार्यालयांत छायाचित्रे जमा करावीत.

- स्वाती थविल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी.

Web Title: The names of 400 voters in the district are in danger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.