भाजपाच्या स्वीकृत नावांचा घोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:01 AM2017-09-25T01:01:06+5:302017-09-25T01:01:10+5:30
भाजपा आमदारांच्या अंतर्गत संघर्षामुळे रखडलेली महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची नावे रविवारी म्हणजे आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीच्या पूर्वसंध्येलाही निश्चित होऊ शकलेली नाही. त्यामुळे सोमवारी (दि.२५) होणाºया बैठकीतही भाजपाकडून या विषयाला बगल दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपाचे सर्व आमदार दिल्ली येथे बैठकीसाठी रवाना झाले असून, ते बुधवारी परतणार आहेत. त्यामुळे पुढील महिन्याच्या महासभेतच या नावांची घोेषणा होण्याची शक्यता आहे.
नाशिक : भाजपा आमदारांच्या अंतर्गत संघर्षामुळे रखडलेली महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची नावे रविवारी म्हणजे आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीच्या पूर्वसंध्येलाही निश्चित होऊ शकलेली नाही. त्यामुळे सोमवारी (दि.२५) होणाºया बैठकीतही भाजपाकडून या विषयाला बगल दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपाचे सर्व आमदार दिल्ली येथे बैठकीसाठी रवाना झाले असून, ते बुधवारी परतणार आहेत. त्यामुळे पुढील महिन्याच्या महासभेतच या नावांची घोेषणा होण्याची शक्यता आहे. महापालिकेत भाजपाचे तीन तर शिवसेनेचे दोन स्वीकृत सदस्य (नगरसेवक) पक्षीय तौलनिक बळानुसार नियुक्त करण्यात येणार आहेत. शिवसेनेच्या वतीने दोन नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. मात्र, भाजपाचा घोळ मिटत नसल्याचे दिसते आहे. भाजपा शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी ठरविलेली नावे अन्य आमदारांना मान्य नाहीत. गेल्या वेळी ही नावे देण्याची वेळ आली तेव्हा म्हणजे १५ सप्टेंबर रोजी शहरातील एका आमदाराने सर्वांना विश्वासात न घेता नावे निश्चित करण्यात येत असल्याची तक्रार पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यामुळे भाजपाने ही प्रक्रिया स्थगित केली. भाजपाने उमेदवार निश्चितीसाठी महिनाभराची मुदत मागून घेतली. स्वीकृत नगरसेवक हे महापौरपदाच्या निवडणुकीनंतर महिनाभरात ही नियुक्ती होणे आवश्यक होते, परंतु ते शक्य झालेले नाही. आता आयुक्तांनी याबाबत सोमवारी (दि.२५) बैठक बोलावली असून, त्यात नावे जाहीर होण्याची शक्यता होती. तथापि, त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली रविवारी झाल्या नाहीत.
त्यातच दिल्ली येथे भाजपाच्या राष्टÑीय कार्यकारिणीची बैठक असून, त्यासाठी सर्व आमदार आणि खासदारांना उपस्थित राहण्याचे फर्मान आल्याने हे सर्व जण रवाना झाले आहेत. हे सर्व बुधवारी किंवा गुरुवारी नाशिकला परतणार असून, त्यानंतर त्यावर हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वीकृत सदस्यांची नावे महासभेत घोषित करायची असल्याने अजून अवकाश असून, त्यामुळेच दसºयानंतर नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी मात्र अद्याप स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित झाली नसल्याचे स्पष्ट केले.