गाळणेत दारांवर झळकले मुलींच्या नावाचे फलक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 10:31 PM2019-12-22T22:31:39+5:302019-12-23T00:22:06+5:30
विद्यार्थिनींचा आत्मसन्मान उंचविण्यासाठी गाळणेतील प्राथमिक शाळेने अभिनव उपक्रम राबविला. गाळणे येथे शाळेतील मुलींच्या नावाच्या गावातील घरांच्या दारांवर लावण्यात आल्या.
झोडगे : विद्यार्थिनींचा आत्मसन्मान उंचविण्यासाठी गाळणेतील प्राथमिक शाळेने अभिनव उपक्रम राबविला. गाळणे येथे शाळेतील मुलींच्या नावाच्या गावातील घरांच्या दारांवर लावण्यात आल्या.
विद्यार्थीनीच्या घराच्या दारावर मुलीच्या नावाची पाटी लावून महिला सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरू केली. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी व गटशिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, केंद्रप्रमुख दिलीप जावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी गावात प्रभातफेरी काढून विद्यार्थिनींनी लेक वाचवा लेक शिकवा, शिकलेली आई घरदार पुढे नेई, अशा घोषणा दिल्या. शिक्षक व पालकांनी घरोघरी जाऊन मुलींच्या घराच्या दारावर उपक्रम नावाची पाटी लावली. उपक्रमातून मुलींचे व महिलांचे समाजातील स्थान महत्वाचे असल्याचे पटवून दिले. उपक्रमासाठी खैरनार, वाघ, खैरनार, बेलदार,सरपंच प्रतिभा सोनवणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना भालेराव, सदस्य मनीषा भालेराव, पालक उपस्थित होते.