भाटगाव येथे झळकल्या मुलींच्या नावाच्या पाट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 11:18 PM2020-01-05T23:18:14+5:302020-01-05T23:18:31+5:30
येवला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भाटगाव येथे करूया सन्मान लेकीचा उपक्र म पार पडला. यावेळी शाळेच्या प्रांगणात गुढी उभारण्यात आली. तर लेक वाचवा, लेक शिकवा अशी रांगोळी आकर्षण ठरली. गुढीचे पूजन माधव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा भाटगाव येथे करूया सन्मान लेकीचा उपक्र म पार पडला. यावेळी शाळेच्या प्रांगणात गुढी उभारण्यात आली. तर लेक वाचवा, लेक शिकवा अशी रांगोळी आकर्षण ठरली. गुढीचे पूजन माधव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
शिक्षिका भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक शालिनी जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. पायल वाघ हिने कविता सादर केली. त्यांनतर विविध कार्यकारी सोसायटी अध्यक्ष वसंत पवार यांनी मार्गदर्शन केले. प्रभातफेरी काढत लेक वाचवा,लेक शिकवा, मुलगा-मुलगी एक समान, दोघांनाही शिकवू छान, अशा विविध घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर पालकांनी मुलींचे औक्षण करून दारावर मुलीच्या नावाची पाटी लावली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शंकर होन, उपाध्यक्ष दत्तू साबळे, बाबासाहेब पवार, शालिनी सूळ, शलाका भुजबळ, पुष्पा शिंदे आदी उपस्थित होते.