आत्महत्या केलेल्या अनेक शेतकऱ्यांची नावे गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 07:47 PM2020-10-08T19:47:42+5:302020-10-09T01:07:02+5:30
पिंपळगाव बसवंत : कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी नोंदच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कारसूळचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी देवेंद्र काजळे यांनी हा प्रकार खुद्द जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
पिंपळगाव बसवंत : कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केलेल्या निफाड तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी नोंदच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. कारसूळचे सामाजिक कार्यकर्ते व शेतकरी देवेंद्र काजळे यांनी हा प्रकार खुद्द जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या निदर्शनास आणून दिला आहे.
राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबियांना मदत मिळावी, यासाठी राज्यातील महाविकास आघाडी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी नाशिकचे विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. अशा आत्महत्याग्रस्त शेतकर्यांना काय मदत करता येईल, याबाबत विचारविनिमय केला जात आहे. स्वयंरोजगारासाठी विकासाच्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. हे काम करत असतांना विषप्राशन, गळफास, विहिरीत पडून अपघाती मृत्यू, नदी, कालव्यात बुडून मृत्यू अशा प्रकारे अनेक शेतकºयांच्या झालेल्या मृत्यूची नोंद शासनाच्या दफ्तरी आहे. मात्र, त्यांची प्रकरणे नामंजूर झाली आहेत. या कुटुंबांचादेखील सरकारने विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याशिवाय, अनेक आत्महत्या केलेल्या शेतकºयांच्या नोंदीच दफ्तरी नसल्याचेही समोर आले आहे.
कर्जबाजारीपणा किंवा अपघाती मृत्यू झालेल्या शेतकºयांची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दफ्तरी नसेल तर यावर गांभीर्याने विचार केला जाईल. याबाबत निफाडचे तहसीलदार, मंडल अधिकाºयांना तत्काळ सूचना दिल्या जातील.
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी
विभागीय आयुक्तांनी आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांसाठी ‘उभारी’ या योजनेसाठी आत्महत्या केलेल्या शेतकºयांची यादी बनविली आहे. यात अनेक आत्महत्या केलेल्या शेतकºयांची नावे नसल्याचे निदर्शनास आले आहे. या वचिंत आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबांची पण भेट घेऊन त्यांना मदत मिळावी.
- देवेंद्र काजळे, सामाजिक कार्यकर्ते, कारसूळ