संभाजीनगर नामकरणाचे स्वागतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 01:55 AM2021-01-04T01:55:53+5:302021-01-04T01:56:14+5:30
औरंगाबादचे संभाजी महाराज यांच्या नावाने संभाजीनगर असे नामकरण होत असेल तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे, नामकरणाच्या निर्णयाला आपले समर्थन असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार संभाजी राजे भोसले यांनी केले आहे. मात्र या विषयी कोणतेही राजकीय भाष्य करणे त्यांनी यावेळी टाळले.
नाशिक : औरंगाबादचे संभाजी महाराज यांच्या नावाने संभाजीनगर असे नामकरण होत असेल तर त्याचे स्वागतच करायला पाहिजे, नामकरणाच्या निर्णयाला आपले समर्थन असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार संभाजी राजे भोसले यांनी केले आहे. मात्र या विषयी कोणतेही राजकीय भाष्य करणे त्यांनी यावेळी टाळले.
नाशिकमधील शासकीय विश्रामगृहात रविवारी (दि. ३) ते पत्रकारांशी बोलत होते. आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्लूएस) आरक्षण घेतल्याने सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) आरक्षणाला धोका निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. मराठा समाजाने पहिल्या दिवसापासून सामाजिक मागासलेपण सिद्ध केले आहे. ईडब्लूएस आरक्षण सर्व खुल्या वर्गासाठी आहे ते फक्त मराठा समाजासाठी नाही, त्यामुळे मराठा समाजाला एसईबीएस प्रवर्गातूनच आरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशाेक चव्हाण हे अनुभवी असून मराठा आरक्षणप्रश्नी त्यांनी योग्य तो समन्वय साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. यावेळी विविध मराठा संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित हाेते.