एकाच रस्त्याचे दोन महिन्यात बदलले नामकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 06:18 PM2018-08-10T18:18:28+5:302018-08-10T18:19:52+5:30
दोन अडीच महिण्यांपुर्वी पेठ शहरातील जून्या बसस्टॅन्ड पासून सुरू होणाऱ्या जोगमोडी रस्त्याच्या झालेल्या नामकरणावरून उद्भवलेल्या वादावर आदिवासी क्रांतीदिनी दुसºयांदा नामकरण झाल्याने सद्या तरी पडदा पडल्याचे दिसून येत आहे.
पेठ : दोन अडीच महिण्यांपुर्वी पेठ शहरातील जून्या बसस्टॅन्ड पासून सुरू होणाऱ्या जोगमोडी रस्त्याच्या झालेल्या नामकरणावरून उद्भवलेल्या वादावर आदिवासी क्रांतीदिनी दुसºयांदा नामकरण झाल्याने सद्या तरी पडदा पडल्याचे दिसून येत आहे.
पेठ शहरातील सर्वाधिक वर्दळ असलेल्या या चौकाला आदिवासी क्रांतीकारक देवाजी राऊत यांचे नाव देण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र त्यांच्या नावाचा फलक कोठेही लावण्यात आला नव्हता. दोन मिहण्यापुर्वी डांग सेवा मंडळाचे सचिव स्व. विजय बिडकर यांच्या स्मरणार्थ या रस्त्याला आदरणीय विजय बिडकर मार्ग असे नामकरण करून तालुक्यातील लोकप्रतिनिधींच्या हस्ते नामफलकाचे अनावरणही करण्यात आले. ही बाब निदर्शनास आल्यावर अखिल भारतीय आदिवासी एकता परिषद व युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेत. सदरचे नामकरण रद्द करून क्रांतीकारक देवाजी राऊत यांचे नाव देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. यावर सोशल मिडीयावर मोठया प्रमाणावर चर्चेच्या फैरी व आरोप प्रत्यारोपही झाले.
अखेर ९ आॅगष्ट क्रांती दिन व आदिवासी गौरव दिनाच्या पाशर््वभूमीवर पुर्वीचा फलक काढून आदिवासी क्रांतीवीर देवाजी राऊत चौक व मार्ग असे दुहेरी नामकरण करण्यात आले. यामुळे सद्या तरी या प्रकरणावर पडदा पडला असला तरी एकाच चौकात दोन वेळा नामकरण सोहळा झाल्याने व दोन्ही सोहळ्यांना तेच लोकप्रतिनिधी उपस्थित असल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
आदिवासी एकता परिषद व युवक कॉग्रेसच्या मागणीमुळेच नामकरण बदलण्यात आल्याचा कार्यकर्त्याकडून दावा केला जात आहे तर संपुर्ण तालुक्यातील आदिवासी बांधवांच्या भावना लक्षात घेऊन
क्रांतीवीर देवाजी राऊत यांचे नाव देण्यात आल्याने याचे कोणत्याही राजकी पक्ष अथवा संघटनेने श्रेय लाटू नये अशाही भावना व्यक्त केल्या जात आहेत.