नाशिकची नमिता ‘वर्ल्डवाइड क्वीन’
By admin | Published: December 17, 2015 12:33 AM2015-12-17T00:33:08+5:302015-12-17T00:37:57+5:30
नाशिकची नमिता ‘वर्ल्डवाइड क्वीन’
नाशिक : येथील नमिता परितोश कोहक यांना ‘आंतरराष्ट्रीय वर्ल्डवाइड-२०१५’चा किताब मिळाला असून हॉँगकॉँग येथे झालेल्या स्पर्धेत त्या विजेता ठरल्या.
सामाजिक आरोग्य या उद्देशाने घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी भारतातील अंतिम यादीमधून कोहक यांची एकमेव निवड झाली होती. कोहक यांनी स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत विजय प्राप्त केला. त्यांनी ‘ग्लोरी आॅफ ट्रॅडिशन’ हा पुरस्कारही पटकाविला. त्यांनी पैठणी परिधान करून स्पर्धेत ‘रॅम्प वॉक’ सादर केला. प्रेक्षकांनी प्रथमच पैठणीवर रॅम्प वॉक बघितल्यामुळे त्यांच्या या सादरीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रीयन संस्कृती व येथील पोशाखाचा मला नेहमीच अभिमान वाटतो. म्हणून रॅम्प वॉकसाठी मी पैठणीची निवड केली, असे कोहक यांनी सांगितले. वर्ल्डवाइड स्पर्धेमध्ये जगभरातील २८ देशांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा मंगळवारी (दि. १२) रोजी पार पडली. (प्रतिनिधी)