बनावट कागदपत्रे  देऊन नामको बॅँकेला ४१ लाखांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 01:26 AM2018-04-26T01:26:09+5:302018-04-26T01:26:09+5:30

वाहने खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रे अंबड येथील नाशिक मर्चंट्स  को-आॅप. बॅँकेच्या शाखेत देऊन कर्ज प्रकरणात सुमारे ४१ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Namko has paid 41 lakh for making fake documents | बनावट कागदपत्रे  देऊन नामको बॅँकेला ४१ लाखांना गंडा

बनावट कागदपत्रे  देऊन नामको बॅँकेला ४१ लाखांना गंडा

googlenewsNext

सिडको : वाहने खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रे अंबड येथील नाशिक मर्चंट्स  को-आॅप. बॅँकेच्या शाखेत देऊन कर्ज प्रकरणात सुमारे ४१ लाखांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अंबड पोलिसांनी सहा संशयितांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
नामको बॅँकेचे अंबड शाखेचे शाखाधिकारी उमाजी गावित यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित विवेक अरु ण उगले (रा. पाथर्डीफाटा), सुनील रुंजा धोंगडे (रा. कुरेगाव), सोमनाथ गेणू गव्हाणे (रा. सावतानगर), भास्कर परशराम नरवाडे (रा. आंबेबहुला), संगीता पंढरीनाथ कोंबडे, सुरेश गंगाधर कोंबडे (दोघे रा. पाथर्डीफाटा) यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे तयार केली. विविध नामांकित कंपन्यांच्या शोरूमच्या नावाने कोटेशनही बॅँकेच्या शाखेत सादर केले. तसेच टाटा कंपनीचा ट्रक खरेदीसाठी वीस लाख ८५ हजार, फियाट पुंटो इमोशन या कार खरेदीसाठी आठ लाख पन्नास हजार रु पये, टाटा सफारी कार खरेदीसाठी अकरा लाख चाळीस हजार रुपयांचे धनादेश नामको बॅँकेकडून शहरातील विविध नामांकित चारचाकी विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या दालनांच्या नावाने घेऊन पाथर्डीफाटा येथील स्टेट बॅँक आॅफ हैदराबाद शाखेतून तब्बल ४१ लाख रुपये स्वत:च्या वैयक्तिक खात्यावरून काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. यावेळी संबंधित उगले याने स्वत:ला मोटार विक्री दालनाचा संचालक असल्याचे भासवले. दरम्यान, नामको बॅँकेकडे खोटी व बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, उपनिरीक्षक सुजित मुंढे करीत आहेत.
असा झाला उलगडा...
संशयित कर्जदारांनी धनादेश आयसीआयसीआय बॅँकेचा नामकोच्या अंबड शाखेला दिला. हा धनादेश बॅँकेने पाठविला; मात्र धनादेश वटू शकला नाही. या प्रकरणी नामको व्यवस्थापनाने संबंधितांना नोटीस बजावली. नोटिसांद्वारे खरेदी वाहने पडताळणीसाठी बॅँकेत हजर करावी, असे फर्मान सोडले; मात्र कर्जदारांनी वाहन खरेदी न करता रोकड लंपास केल्याचे उघडकीस आले.
संचालक भासविले
च्उगले याने नामांकित दालनाचे  स्वत:ला संचालक भासवून बॅँकेकडून वाहन खरेदीसाठी घेतलेले धनादेश अनुक्रमे २० लाख ८५ हजार, ८ लाख ५० हजार, ११ लाख ४० हजार रुपयांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदर धनादेश उगले याने संगनमताने स्टेट बॅँक आॅफ हैदराबादच्या शाखेतून वटविले. यावेळी त्याने परस्पर रक्कम काढून बॅँकेची फसवणूक केली. या प्रकरणामध्ये बॅँकेच्या कर्मचाºयांसह अधिकाºयांवरही पोलिसांना संशय आहे. उगले याने वरील मोटार विक्री करणाºया दालनांच्या नावाने बनावट व नावांशी साम्य असलेले कार्यालयही उघडले होते  असे समजते.

Web Title: Namko has paid 41 lakh for making fake documents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.