नामपूरला २२ कोरोना बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2020 08:25 PM2020-08-10T20:25:56+5:302020-08-10T20:26:21+5:30
नामपूर : गेल्या आठवड्यात नामपुर शहरात नामांकित व्यावसायिक कोरोना बाधित आढळून आला होता. दुर्दैवाने स्वत:च्या कुटुंबातील व संपर्कातील इतर व्यवसायिक असे एकाच दिवशी १० कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.
नामपूर : गेल्या आठवड्यात नामपुर शहरात नामांकित व्यावसायिक कोरोना बाधित आढळून आला होता. दुर्दैवाने स्वत:च्या कुटुंबातील व संपर्कातील इतर व्यवसायिक असे एकाच दिवशी १० कोरोना बाधितांची संख्या वाढल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच नामपुर शहरात शिवनगर, झेंडा चौक, आनंद चौक, सोनाई नगर, रायगड नगर, मालेगाव रोड, साक्र ी रोड आदी ठिकाणी कोरोना बाधित पेशंट सापडल्याने बाधितांची एकूण संख्या २२ पर्यंत पोचली आहे.
एकही पेशंट नसल्याने शहराची सर्व व्यवहार सुरळीत चालू होती. एकाच आठवड्यात कोरोना बाधितांची संख्या २२ पर्यंत पोहोचल्याने नामपूरकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. शहरात अधिक करून बाधितांमध्ये व्यावसायिकांची संख्या अधिक असल्याने व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. शहरात रोजच कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने आरोग्य विभाग, पोलिस प्रशासन, ग्रामपंचायत प्रशासन आदींची जोखीम वाढल्याचे चित्र आहे.
कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करून देखील कोरोना बाधित संख्या अचानक वाढल्याने भिती व्यक्त केली जात आहे. परीणामी येथील व्यवहार ठप्प झाले आहेत. पूर्ण शहरात ४०० मीटर कंटेनमेंट झोन व ७०० मीटर बफर झोन जाहीर झाला असल्याने तसेच कोरोना आटोक्यात आणण्यासाठी पूर्ण शहर दिनांक २० तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला असल्याचे सरपंच अशोक पवार यांनी सांगितले.
शहरातील कोरोना रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून सर्वोतपरी उपायोजना केल्या जात आहेत. यात गावात जंतुनाशक फवारणी. आरोग्य सेवक ,आशा सेविका यांच्यामार्फत थर्मल स्कॅनिंग, होमिओपॅथी गोळ्यांचे वाटप आदी उपाय योजना राबवले जात आहेत. नामपुर येथे ग्रामीण रु ग्णालयाची भव्य इमारत असून येथे रॅपिड टेस्ट केंद्राची मागणी ग्रामपंचायत व नागरिकांनी केली आहे. कोरोना बाधितांच्या संपर्कातील नागरिकांसाठी नामपुरला रॅपिड टेस्ट केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी केशव इंगळे यांनी दिली.