नामपूरला दोन दिवसांत कोविड रुग्णालय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 04:15 AM2021-04-27T04:15:07+5:302021-04-27T04:15:07+5:30

सध्या बागलाण मध्ये १६०० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. संपूर्ण बागलाण तालुक्यातील १७१ गावांना अवघे डांगसौंदाणे येथील एकमेव ऑक्सिजन सुविधा ...

Nampur will have Kovid Hospital in two days | नामपूरला दोन दिवसांत कोविड रुग्णालय होणार

नामपूरला दोन दिवसांत कोविड रुग्णालय होणार

googlenewsNext

सध्या बागलाण मध्ये १६०० पेक्षा अधिक रुग्ण आहेत. संपूर्ण बागलाण तालुक्यातील १७१ गावांना अवघे डांगसौंदाणे येथील एकमेव ऑक्सिजन सुविधा असलेले ग्रामीण रुग्णालय आहे. येथे केवळ ३० बेड ऑक्सिजनचे आहेत.

गेले अनेक दिवस नामपूर व सटाणा ग्रामीण रुग्णालयात नव्याने ऑक्सिजन बेड सुरू करण्याची मागणी लोकप्रतिनिधी करीत असताना त्याकडे आरोग्य विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे आमदार दिलीप बोरसे, जि.प.चे माजी शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, बाजार समितीचे माजी सभापती संजय सोनवणे यांच्या शिष्टमंडळाने पोलीस महानिरीक्षक दिघावकर यांची भेट घेत या गंभीर परिस्थितीची जाणीव करून दिली.

याबाबत दिघावकर यांनी तात्काळ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी बागलाण तालुक्यात दोन दिवसांत कुठल्याही परिस्थितीत नामपूर ग्रामीण रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू करून डांगसौंदाणे येथेही बेड वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील व तात्काळ नामपूर येथील रुग्णालय सुरू करण्याचे आश्वासन डॉ. थोरात यांनी दिले.

फोटो- २६ नामपूर कोविड

बागलाण तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेविषयी विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांना निवेदन देताना यतीन पगार. समवेत आमदार दिलीप बोरसे, संजय सोनवणे आदी.

===Photopath===

260421\26nsk_25_26042021_13.jpg

===Caption===

फोटो- २६ नामपूर कोविडबागलाण तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेविषयी विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांना निवेदन देताना यतीन पगार. समवेत आमदार दिलीप बोरसे, संजय सोनवणे आदी.  

Web Title: Nampur will have Kovid Hospital in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.