ननाशीच्या रूग्णाची कोरोनाशी झुंज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 07:56 PM2020-07-09T19:56:03+5:302020-07-10T00:23:26+5:30
ननाशी : येथील बाधित रूग्णाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून आठ जुलैला या रूग्णाला जिल्हा रु ग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. ननाशी येथील ५३ वर्षीय एका मसाला विक्रेत्याला गत आठवड्यात कोरोना सदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे २९ जूनला त्यांना जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले.
ननाशी : येथील बाधित रूग्णाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून आठ जुलैला या रूग्णाला जिल्हा रु ग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. ननाशी येथील ५३ वर्षीय एका मसाला विक्रेत्याला गत आठवड्यात कोरोना सदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे २९ जूनला त्यांना जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला परंतु या स्वॅबचा रिपोर्ट अनिर्णित आल्याने पुन्हा त्यांचे स्वब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा ३ जुलै रोजी अहवाल प्राप्त होऊन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ग्रामपंचायततर्फे कंटेन्मेंट झोन निश्चित करून सील करण्यात आला. तसेच या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींना कोविड केअर सेंटरला पाठविण्यात आले. गावातील नागरिकांनी स्वत:ची काळजी घेऊन प्रशासन आणि आरोग्य विभाग वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना भोये, सरपंच दत्ता शिंगाडे, ग्रामविकास अधिकारी एम. पी. गावित यांनी यावेळी केले आहे.
-------------------------
कोविड केअर सेंटरला पाठविलेल्या व्यक्तींचेही अहवाल निगेटीव्ह आले. या रूग्णावर जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आणि परत एकदा त्यांची तपासणी करन्यात आली त्याचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णाचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.