‘नंद के घर आनंद भयो’वर धरला ठेका रंगिलो नखरालो राजस्थान : माहेश्वरी महिला मंडळाच्या स्नेहसंमेलनात नृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2018 01:14 AM2018-01-05T01:14:06+5:302018-01-05T01:14:48+5:30
नाशिक : गुलाबी रम्य सायंकाळ, रंगबिरंगी वेशभूषांसह लयदारपणे सादर होत असलेली माहेश्वरी सणांवर आधारित गाणी, नृत्य, तितक्याच दमदारपणे त्याला मिळत असलेली सूरसाथ, प्रत्येक गाण्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉद्वारे होत असलेला बक्षिसांचा वर्षाव, शेरोशायरीसह तितक्याच चपखलतेने होत असलेले निवेदन या साºयांमुळे सखी भारावल्या होत्या.
नाशिक : गुलाबी रम्य सायंकाळ, रंगबिरंगी वेशभूषांसह लयदारपणे सादर होत असलेली माहेश्वरी सणांवर आधारित गाणी, नृत्य, तितक्याच दमदारपणे त्याला मिळत असलेली सूरसाथ, प्रत्येक गाण्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉद्वारे होत असलेला बक्षिसांचा वर्षाव, शेरोशायरीसह तितक्याच चपखलतेने होत असलेले निवेदन या साºयांमुळे सखी भारावल्या होत्या. निमित्त होते ‘रंगिलो नखरालो राजस्थान’ कार्यक्रमाचे.
गुरुवारी (दि.४) सायंकाळी परशुराम सायखेडकर नाट्यगृहात माहेश्वरी महिला मंडळातर्फे आयोजित या कार्यक्रमास शहरातील माहेश्वरी समाजबांधवांचा उदंड प्रतिसाद लाभला. गणेश वंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर विविध ग्रुपतर्फे ‘बम बम भोले’,‘तिज त्योहार’, ‘घुमर घुमर’, ‘संदेशे आते है’, ‘हाथो मे पूजा की थाली’, नंद के घर आनंद भयो, जय कन्हैया लाल की’ आदी नृत्य सादर करण्यात आले.
स्मिता लोया यांनी प्रास्तविक केले. उज्ज्वला मुंदडा, मोहिनी चांडक, नीलम भन्साळी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी संगीता कलंत्री, वर्षा बांगड, सुषमा लोया, शिल्पा जाजू, वैशाली मुंदडा, जयमाला बंग, रख्मा चांडक आदींसह माहेश्वरी समाजबांधव व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. माहेश्वरी समाजात वर्षभर साजºया होणाºया ‘गणगौर, तीज, करवा चौथ’ आदींसह सर्व सणांवर आधारित गाणी यावेळी नृत्यासह सादर करण्यात आली. लहान मुलीपासून ते वयोवृद्ध महिलेपर्यंत सर्व वयोगटांतील महिलांनी यावेळी एकाहून एक सरस नृत्ये, नाट्य, चुटकुले सादर केले. माहेश्वरी महिला मंडळातर्फे आयोजित या स्नेहसंमेलनाचे हे पहिलेच वर्ष असून, उपनगरातील सर्व माहेश्वरी मंडळांचा या उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रत्येक गाण्यानंतर मान्यवरांच्या हस्ते लकी ड्रॉ काढण्यात आल्या. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली.