नांदगावी सर्वपक्षीय बंद

By admin | Published: March 5, 2017 12:04 AM2017-03-05T00:04:02+5:302017-03-05T00:04:21+5:30

नांदगाव : वैद्यकीय अधीक्षकांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. ४) स्वयंस्फूर्तीने सर्वपक्षीय बंद पाळण्यात येऊन मूक मोर्चा काढण्यात आला.

Nandagavi All-party closure | नांदगावी सर्वपक्षीय बंद

नांदगावी सर्वपक्षीय बंद

Next

नांदगाव : वैद्यकीय अधीक्षकांना शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ शनिवारी (दि. ४) स्वयंस्फूर्तीने सर्वपक्षीय बंद पाळण्यात येऊन मूक मोर्चा काढण्यात आला.
शहरातील लहानमोठ्या व्यावसायिकांसह सर्व डॉक्टर्स, मेडिकल्स, भाजपा, शिवसेना, रिपाइं काँग्रेस, राष्ट्रवादी आदि विविध राजकीय पक्षांसह सामाजिक संघटनांच्या पदाधिकारी, विविध शाळा-महाविद्यालये बंदमध्ये सहभागी झाले होते.
शहरातील प्रमुख भागातून मोर्चा काढण्यात आला. सदरचा मोर्चा पोलीस स्टेशनला आल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी माजी आमदार संजय पवार, माजी सभापती वाय.पी. जाधव, माजी नगराध्यक्ष भास्कर कदम, भाजपा तालुकाध्यक्ष दत्तराज छाजेड, राष्ट्रवादीचे
तालुका अध्यक्ष संतोष गुप्ता, शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजू देशमुख, जगताप, संजय मोकळ, विनायक बोरसे आदिंची भाषणे झाली. (वार्ताहर)
 

Web Title: Nandagavi All-party closure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.