नांदगावी तयार फराळासाठी लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 11:43 PM2018-11-02T23:43:39+5:302018-11-02T23:46:48+5:30
नांदगाव शहरात १० ते १५ ठिकाणी आचारी मंडळींनी भट्ट्या लावल्या आहेत. शेव, चिवडा, लाडू, गाठी, फापडा, बुंदी, चिवडा, तिखट शेंगदाणे आदी खाद्यपदार्थ बनवून घेण्यासाठी गृहिणींची लगबग दिसून येत आहे. मिठू महाराज, लक्ष्मीनारायण, भवानीशंकर, संत महाराज, अशोक विसपुते, जगधने, नारायण महाराज आदींनी शहरात जागोजागी भट्ट्या उभारल्या आहेत.

दररोज सकाळी ८ ते १० या वेळात भट्ट्या सुरू होतात. त्यासाठी पहाटेपासून महिलावर्ग रांग लावून आपला नंबर केव्हा येईल याची वाट बघत असतो. बागोरे यांनी ना नफा ना तोटा तत्त्वावर सामान्यांसाठी शेव, चिवडा व इतर पदार्थ रेडीमेड उपलब्ध करून दिले आहेत. अनेक दुकानदारांनी पॅकिंगमधील तयार माल विक्रीला ठेवला आहे.
किराणा दुकानदारांनी विशिष्ट रकमेची खरेदी करणाऱ्यांसाठी विशेष सवलती, भेटवस्तू व घरपोच सेवा देऊ केली आहे. गेल्या दशकात घरोघरी बनविले जाणारे फराळाचे पदार्थ व त्यांची घरोघरीची चव आता आचारी मंडळीच्या हाताने घेतली आहे. कोणता खाद्यपदार्थ बनविण्यासाठी कोणकोणत्या वस्तू लागतात याचे छापिल पत्रक आचाºयांनी तयार करून घेतले आहे.