नांदगावी दहा किलो प्लास्टीक पिशव्या जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 12:11 PM2020-03-10T12:11:23+5:302020-03-10T12:11:31+5:30
नांदगाव : तालुक्यातील घाटमाथ्यावरील ढेकू जातेगाव बोलठाण रोहिले इत्यादी गावांमध्ये होळीच्या दिवशी नांदगाव पंचायत समितीच्या प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई करत तीन दुकानांवर दंडात्मक कारवाई करु न दहा किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या.
नांदगाव : तालुक्यातील घाटमाथ्यावरील ढेकू जातेगाव बोलठाण रोहिले इत्यादी गावांमध्ये होळीच्या दिवशी नांदगाव पंचायत समितीच्या प्लास्टिक विरोधी पथकाने कारवाई करत तीन दुकानांवर दंडात्मक कारवाई करु न दहा किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. बाकी सर्व किराणा तसेच इतर दुकाने आणि आस्थापनांना प्लास्टिकचा वापर बंद करणे बाबत सूचना तसेच नोटीस बजावण्यात आल्या. या कारवाईमध्ये जातेगाव येथील कचरू विश्वनाथ व्यवहारे यांच्यावर प्लास्टिक बंदी कायद्या नुसार दंडात्मक कारवाई करतांंना पाच हजार रु पयांचा दंड ठोठावण्यात आला. या कारवाईत नांदगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी, सहाय्यक गटविकास अधिकारी एस.एल. खताळे, बालविकास प्रकल्प अधिकारी सागर वाघ, विस्तार अधिकारी डी.एस.मांडवडे, ग्रामसेवक भगवान जाधव, यांच्यासह स्थानीक ग्रामपंचायत कर्मचार्यांनी सहभाग घेतला होता. तर बोलठाण येथील ग्रामपंचायतने अगोदरच जनजागृती मोहीम राबवून सर्व दुकाने आणि आस्थापनांना प्लास्टीकचा वापर बंद करणे बाबत नोटिस बजावलेल्या असल्याने तेथे दुकानांची झाडाझडती केली असता प्लास्टिक आढळुन आले नाही. तर रोहिले आण िढेकु येथील किराणा दुकानदारांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.