नांदगावी शिवसेनेचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 02:39 PM2019-01-10T14:39:35+5:302019-01-10T14:41:30+5:30
नांदगाव : वीज बिल माफीसह कांद्याला हमी भाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी नांदगाव तालुका शिवसेनेतर्र्फे गुरूवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
नांदगाव : वीज बिल माफीसह कांद्याला हमी भाव मिळावा यासह इतर मागण्यांसाठी नांदगाव तालुका शिवसेनेतर्र्फे गुरूवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, जिल्हाध्यक्ष सुहास कांदे यांनी केले. यावेळी शिवसैनिकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. सरासरीच्या अवघे ४० टक्के पर्जन्यवृष्टी झाल्याने तालुक्यातील भूगर्भ जलपातळी खोल गेली असून अनेक गावांना जलशोष निर्माण झाला आहे. शासनाने नांदगाव तालुका गंभीर दुष्काळी परिस्थितीच्या यादीत टाकला असला तरी अद्याप दुष्काळ जाहीर नाही. पिण्याच्या पाण्याचे टॅकर मंजुरीला तीन ते चार आठवडे लागतात. मंजुरी आल्यानंतर व टॅँकर हजर झाल्यानंतर त्याची फेरी निश्चिती करण्याला विलंब होत आहे. फेरी निश्चित करणे हा तहसीलदारांचा अधिकार आहे. मात्र तहसीलदार त्याला विलंब करत असल्याने ते जागेवरच उभे आहेत असा आरोप शिवसेना नेत्यांनी केला. मागण्यांमध्ये सात-बाराचा उतारा कोरा करावा यासह हेक्टरी ५० हजार रु पयांचे अनुदान, वीज बिल माफी, चारा छावण्या, कांद्याला हमी भाव, माणिकपुंज धरणातील पाटचाऱ्याची कामे व पाण्याचे योग्य वाटप, रोहयोची कामे, शालेय शुल्क माफी, नार पार योजनेत नांदगाव तालुक्याचा समावेश, तसेच विकासाच्या दृष्टीने आवश्यक विविध योजना सुरु कराव्यात अशा मागण्यांच्या पूर्ततेसाठी सरकारला जाग यावी यांचा समावेश आहे.