चांडक कन्या विद्यालयात अवतरले नभांगण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:41 PM2019-09-24T18:41:11+5:302019-09-24T18:42:20+5:30
सिन्नर येथील चांडक कन्या विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिक व अलाहाबाद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामानाने शाळेत हसत खेळत विज्ञान व थ्रीडी नभांगण हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
सिन्नर : येथील चांडक कन्या विद्यालयात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती नाशिक व अलाहाबाद ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यामानाने शाळेत हसत खेळत विज्ञान व थ्रीडी नभांगण हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला.
भास्कर सदाफळे यांनी सुरुवातीला हसत-खेळत विज्ञान या विषयावर समाजातील काही भोंदूबाबा विज्ञानाच्या प्रयोगांचा, सिद्धांताचा आधार घेऊन कशाप्रकारे चमत्कार करतात, करणी उतरवतात, भूत उतरवतात हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखविले व त्यामागील विज्ञान काय आहे याचा उलगडा केला.
त्यानंतर एका मोठ्या आकाराच्या डोममध्ये सुमारे ७० विद्यार्थी बसतील अशा पद्धतीने थ्रीडी स्वरूपात दृकश्राव्य असे पृथ्वीची निर्मिती कशी झाली. अवकाशात कोणकोणत्या घटना घडतात, आपल्या सूर्यमालेतील सर्व ग्रह, परिवलन, परिभ्रमण, कृष्णविवरे या सर्वांची थ्रीडी चित्रफितीद्वारे माहिती देण्यात आली.
मुख्याध्यापक माधवी पंडित, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिठे यांचे मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्र मासाठी विज्ञान विषयप्रमुख दीपक बाकळे, संदीप सरोदे, राकेश ननावारे, मनीषा उकाडे, रेश्मा पवार, धनलाल चौरे, शिक्षक, सेवक वर्ग या सर्वांनी कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य केले. भास्कर सदाफळे, शिरसाट त्यांचे सहकारी मिठे या सर्वांचे राकेश नन्नावरे यांनी विद्यालयाच्या वतीने आभार मानले आणि वंदे मातरम या गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.