नांदगाव : सभापतीपदी भाऊसाहेब हिरे, उपसभापतीपदी सुशीला नाईकवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 03:27 PM2019-12-31T15:27:07+5:302019-12-31T15:27:14+5:30
नांदगाव : पंचायत समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब हिरे व उपसभापतीपदी सुशीला नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला व हार गुच्छ देऊन दोघांचा सत्कार केला.
नांदगाव : पंचायत समितीच्या सभापतीपदी भाऊसाहेब हिरे व उपसभापतीपदी सुशीला नाईकवाडे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर समर्थकांनी फटाके फोडून जल्लोष केला व हार गुच्छ देऊन दोघांचा सत्कार केला. पंचायत समिती सभापती विद्यादेवी पाटील यांच्या राजीनाम्यानंतर निवडणूक घेण्यात आली. आमदार सुहास कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक पार पडल्याची माहिती ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे यांनी दिली.
सभापती पदासाठी दोन उमेदवारांची नावे चर्चेला होती. अखेर मांडवड गणातील भाऊसाहेब हिरे यांच्या नावावर एकमत झाल्रे. यापूर्वी भाऊसाहेब हिरे उपसभापती होते. या निवडीमुळे त्यांना बढती मिळाली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. पानेवाडी गणातून भाजपच्या तिकिटावर साहेबराव नाईकवाडे यांनी निवडणूक जिंकली होती. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुशीलाबाई नाईकवाडे या अपक्ष बिनविरोध निवडून आल्या होत्या. मात्र उपसभापती पदासाठी अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पंचायत समितीच्या आठ सदस्यांमध्ये आता भाजपचे दोन सदस्य उरले आहेत.
भाऊसाहेब हिरे हे बाजार समितीचे संचालक आहेत. बाजार समितीच्या राजकारणात त्यांचे वडील विठ्ठल हिरे यांचे महत्वाचे स्थान होते. त्या काळात त्यांना सभापती पदाची संधी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी जिद्दीने राजकारणात आपल्या मुलाला आणून त्याला पंचायत समितीचा सभापतिपद देण्यात मोठी भूमिका बजावली. आमदार सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी व नवीन प्रकल्प आणण्यासाठी आपल्या कारिकर्दीत प्रयत्न करू असे भाऊसाहेब हिरे यांनी सांगितले.