नांदगाव बस आगाराला अडीच कोटी रुपयांचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:24 PM2020-05-15T21:24:05+5:302020-05-15T23:35:55+5:30
नांदगाव : गत दीड महिन्यापासून लॉकडाउन असल्याने नांदगावचे बसस्थानकदेखील प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहे. बस रस्त्यावर न धावल्याने सुमारे अडीच कोटी रुपयांचा फटका नांदगाव बस आगाराला बसला आहे.
नांदगाव : गत दीड महिन्यापासून लॉकडाउन असल्याने नांदगावचे बसस्थानकदेखील प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहे. बस रस्त्यावर न धावल्याने सुमारे अडीच कोटी रुपयांचा फटका नांदगाव बस आगाराला बसला आहे.
नांदगाव बस आगारात सुमारे ५० बसेस आहेत. सध्या आगारप्रमुख बसून आहेत. बसस्थानक सुने सुने झाले आहे. स्थानकाचा परिसर सर्वबाजूंनी स्वच्छ झाला आहे. दैनंदिन वर्दळ असणारे बसस्थानक आता कधी सुरू होईल याची प्रतीक्षा कर्मचारी, प्रवासी करीत आहेत. बसस्थानक बंद असल्याने परिसरातील सर्वच दुकाने बंद आहेत. तसेच बस प्रवाशांवर अवलंबून असलेले रिक्षाचालक- देखील बस सुरू होण्याची प्रतीक्षा करीत आहे. सध्या खासगी चार चाकी वाहनांबरोबर आॅटो रिक्षांचे प्रमाण अधिक दिसून येते. बस, रेल्वे चालू नसल्याने मुंबई, नाशिक, ठाणे, पुणे कल्याण येथे वास्तव्याला असलेले आॅटो रिक्षाचालक हे कुटंबांना घेऊन गावाकडे प्रवास करताना दिसत आहेत. त्यात जळगाव, अमरावती, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, बीड, नांदेड आदी गावांकडे जाणाऱ्या आॅटो रिक्षांचे प्रमाण शेकडोंनी आहे.