नांदगाव मुख्याधिकाऱ्यांची तीन आठवड्यातच बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 01:28 AM2018-07-05T01:28:51+5:302018-07-05T01:29:04+5:30

नांदगाव : येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांची अवघ्या तीन आठवड्यातच पुन्हा शिंदखेडा येथे बदली झाल्याने नागरिकांमध्ये उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.

Nandgaon changed the headquarters to three weeks | नांदगाव मुख्याधिकाऱ्यांची तीन आठवड्यातच बदली

नांदगाव मुख्याधिकाऱ्यांची तीन आठवड्यातच बदली

Next
ठळक मुद्देअवघ्या २१ दिवसांत त्यांची बदली रद्द


 


नांदगाव : येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांची अवघ्या तीन आठवड्यातच पुन्हा शिंदखेडा येथे बदली झाल्याने नागरिकांमध्ये उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे.
मुख्याधिकाºयांच्या बदलीच्या पहिल्या दिवसापासूनच हालचाली सुरू झाल्या व अवघ्या २१ दिवसांत त्यांची बदली रद्दही झाली. येथील नगराध्यक्ष राजेश कवडे शिवसेनेचे असून, शासनातले उच्चपदस्थ अधिकारी यांच्यामार्फत त्यांनी निकत यांना नांदगावी आणण्यासाठी प्रयत्न केले होते. निकत यांच्या बदलीचा शहरातील विविध सामाजिक संस्थांनी तीव्र निषेध केला आहे.
१२ जून रोजी पदग्रहण करून अवधी न देता अत्यंत तातडीने २४ तासांत नियुक्तीच्या ठिकाणी पदभार स्वीकारण्याचे आदेश बजावण्यात आले. त्या अन्वये येथील मुख्याधिकारी विश्वंभर दातीर यांची श्रीगोंदा येथे व अजित निकत यांची शिंदखेडा येथून नांदगाव येथे बदली करण्यात आली. दातीर यांच्यावर त्यांच्या सव्वा वर्षाच्या कार्य कालावधीत दैनंदिन कामांसह अनेक विकासकामे रखडवली होती, असा आक्षेप होता. त्यामुळे लोकप्रतिनिधींना नागरिकांना तोंड देणे मुश्कील झाले होते. या पार्श्वभूमीवर थेट मुख्यमंत्र्यांना नगराध्यक्ष राजेश कवडे व त्यांच्या सहकारी नगरसेवकांनी साकडे घालून काम करणाºया मुख्याधिकाºयांची मागणी केली होती. निकत यांनी पदभार घेतल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली होती. स्वच्छता मोहीम, अतिक्र मण हटविणे, नवीन ठिकाणी बगिचे, रस्ते, व्यापारी संकुलाचे बांधकाम, पाणीपुरवठा सुधार अशा अनेक कामांवर निकत यांनी लक्ष केंद्रित करून आखणी केली होती. दरम्यान, यावलच्या मुख्याधिकारी वसुधा कुरणावळ यांची नांदगावच्या मुख्याधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यांना (दि. ४) रु जू होण्याचा आदेश देण्यात आला आहे. यापूर्वी तत्कालीन मुख्याधिकारी संगीता नांदूरकर व निर्मला गायकवाड यांनी येथे चांगली कामे केली होती.साडेतीन वर्ष ज्या माणसाला शिंदखेड्याला झाली, त्या व्यक्तीची तिथेच परत नेमणूक कशी केली जाते? म्हणजे ज्याच्या त्याच्या वशिल्याने कारभार चालतो. नगरपालिकांना मागच्या महिन्यात लेखापाल दिले. इतर जागा भरल्या. नांदगावमध्ये सुमारे १३ कर्मचाºयांच्या जागा रिकाम्या आहेत.
- राजेश कवडे, नगराध्यक्ष, नांदगाव

Web Title: Nandgaon changed the headquarters to three weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.