नांदगाव महाविद्यालयाने ५० व्या वर्षात पदार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2022 11:29 PM2022-03-07T23:29:58+5:302022-03-07T23:31:59+5:30

नांदगाव : येथील मविप्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना सन १९७२ मध्ये करण्यात आली होती. महाविद्यालयाने सन २०२२ मध्ये ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे.

Nandgaon College enters its 50th year | नांदगाव महाविद्यालयाने ५० व्या वर्षात पदार्पण

नांदगाव महाविद्यालयाने ५० व्या वर्षात पदार्पण केले, त्यानिमित्ताने बोधचिन्हाचे अनावरण करतांना नीलिमा पवार समवेत व्ही. बि. गायकवाड, डी. डी. काजळे व इतर.

googlenewsNext

नांदगाव : येथील मविप्र समाजाचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना सन १९७२ मध्ये करण्यात आली होती. महाविद्यालयाने सन २०२२ मध्ये ५० व्या वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण मविप्र समाजाच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेच्या के .टी .एच .एम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ व्ही. बी. गायकवाड, मविप्र शिक्षणाधिकारी डॉ. डी .डी. काजळे उपस्थित होते. नांदगाव महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय मराठे यांनी वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

समारंभासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. रवींद्र देवरे, डॉ. भागवत चवरे प्रा. प्रशांत कुलकर्णी प्रा. योगेश वाघ प्रा. घनशाम कोळी एम. एल. देसले, संजय पाटील, डी. पी. अहिराव, विलास आहेर, संतोष भाईकर उपस्थित होत.

 

Web Title: Nandgaon College enters its 50th year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.