नांदगावी शासकीय यंत्रणा लागली कामाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 09:07 PM2020-05-12T21:07:03+5:302020-05-12T23:22:39+5:30
नांदगाव : तालुक्यातील आमोदे येथील व्यक्तीचा खासगी हॉस्पिटलमधील कोरोनाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. कोरोनाबाधित व्यक्तीने चाळीसगाव येथील रुग्णालयात उपचार घेतल्याने तेथील डॉक्टर व परिचारिका आदी २३ जणांचे नमुने धुळे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आल्याची माहिती चाळीसगावचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नांदे यांनी दिली. यामुळे चाळीसगाव शहरात खळबळ उडाली आहे.

आमोदे गावातील २०० घरे कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याचे जाहीर करण्यात आले असून, बफर झोन (कमी तीव्रतेचा) व कंटेन्मेंट झोनमध्ये तातडीने सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. आशा व अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या प्रत्येकी पाच टीम दोन्ही झोनमध्ये कार्यरत झाल्या आहेत.
कंटेन्मेंट झोनमध्ये दर दिवशी ५० घरे याप्रमाणे पुढील १४ दिवस सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक ससाणे यांनी दिली. घरातील तीन व्यक्ती, एक गरोदर महिला व शेजारची तीन बालके उच्च धोक्याच्या पातळीवर असून, आजूबाजूच्या घरातील २० लोकांची आरोग्य तपासणी वेहेळगाव प्राथमिक केंद्राचे डॉ. अरविंद माहुलकर व नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.रोहन बोरसे यांनी केली आहे. त्यात कोरोनाची लक्षणे दिसून आलेली नाहीत. एकूण १२ जणांना घरात विलगीकरण करण्यात आले असून, पॉझिटिव्ह व्यक्तीबरोबर गेलेल्या दोघांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
-----------------------------
घरात विलगीकरण
४कोरोनाबाधित व्यक्तीची पिठाची गिरणी असून, गेल्या १४ दिवसात ज्यांनी त्यांच्याकडून दळण करून घेतले आहे अशा व्यक्तींचा सर्व्हे करून त्यांचे १४ दिवसांसाठी घरात विलगीकरण करण्यात येणार आहे. आमोदे गावाचा मालेगाव शहराशी व्यापारी संबंध आहे. प्रभारी तहसीलदार योगेश जमदाडे, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी यांची टीम जातीने लक्ष देऊन आहेत.