नांदगाव जमीन घोटाळा; मंडळ अधिकारी अटकेत

By admin | Published: April 15, 2017 12:56 AM2017-04-15T00:56:51+5:302017-04-15T00:57:18+5:30

नांदगाव जमीन घोटाळा; मंडळ अधिकारी अटकेत

Nandgaon land scam; Board officials detained | नांदगाव जमीन घोटाळा; मंडळ अधिकारी अटकेत

नांदगाव जमीन घोटाळा; मंडळ अधिकारी अटकेत

Next

नाशिक : चार महिन्यांपूर्वी नांदगाव तालुक्यातील कथित जमीन घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक दाखल केलेल्या गुन्"ात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन अर्ज नामंजूर केलेल्या एका मंडळ अधिकाऱ्यास अटक करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला यश आले आहे; मात्र हे संपूर्ण प्रकरण वेगळ्याच वळणावर गेल्याने अहेर यांना पोलीस कोठडी मिळू शकलेली नाही. त्यामुळे लाचलुचपत खात्याची ही कारवाई कागदोपत्री ठरली असली तरी, या प्रकरणातील काही संशयितांवर त्यांनी दाखविलेली मेहेरनजर चर्चेत आहे.
अशोक खंडेराव अहेर असे या मंडळ अधिकाऱ्याचे नाव असून, सरकारी अधिकारी व खासगी व्यक्ती अशा २३ जणांविरुद्ध दाखल गुन्"ात ३१ जानेवारी २०१७ पासून ते फरार असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे म्हणणे आहे. कोणत्याही गुन्"ाच्या मुळाशी जाऊन तपासाची तसेच संशयित आरोपींच्या अटकेसाठी कायम तत्पर असणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या डोळ्यात अहेर यांनी तब्बल साडेतीन महिने धूळ फेकली व त्यांच्या हाती ते लागले नाहीत. अखेर गुरुवारी लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी अहेर यांना अटक करून मालेगावच्या सत्र न्यायालयात दाखल केले. न्यायालयाने अहेर यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. नांदगाव तालुक्यातील नवीन अविभाज्य शर्तींच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात शासनाच्या कोट्यवधी रुपयांच्या नजराणा रकमेची फसवणूक केल्याचा गुन्हा लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने ५ जानेवारी रोजी दाखल केला. त्यातील एकाही संशयित आरोपीला लाचलुचपत प्रतिबंधक खाते अटक करू शकले नाही, बऱ्याच आरोपींना उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर केले. जामीन न मिळू शकलेले अहेर यांना अटक करण्यास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला साडेतीन महिने लागले. (प्रतिनिधी)

Web Title: Nandgaon land scam; Board officials detained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.