नांदगाव नगरपरिषदेतर्फे गरजूंना जेवणाचे डबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2020 05:52 PM2020-04-05T17:52:14+5:302020-04-05T18:03:45+5:30
लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबियांची झालेली अडचण दूर करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात दररोज सुमारे सहाशे ते सातशे जेवणाचे डबे तयार करून त्यांचे गरजूंना वाटप केले जात आहे.
नांदगाव : लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या कुटुंबियांची झालेली अडचण दूर करण्यासाठी नगरपरिषद प्रशासन व सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला असून सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात दररोज सुमारे सहाशे ते सातशे जेवणाचे डबे तयार करून त्यांचे गरजूंना वाटप केले जात आहे.
तहसील कार्यालय, नगरपरिषद प्रशासन व सामाजिक संस्था यांनी हा उपक्र म सुरू केला आहे. नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत मांडलेली सुचना मान्य करण्यात आली. त्यानुसार शहरात मध्यवर्ती ठिकाणी सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयात एक सेंट्रल किचन उभारून तेथे तयार झालेला स्वयंपाक घरपोच देण्यात येत आहे. याच बैठकीत नागरिकांना शिधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले गेले. आचारी सोमनाथ शिरसाठ यांनी विनामूल्य स्वयंपाक बनवून देण्याचे आश्वासन दिले. नगराध्यक्ष राजेश कवडे यांनी किराणा व धान्य तसेच स्वयंपाकासाठी लागणारे गॅस उपलब्ध करून दिले.. सध्या नागरिकांकडून दररोज भाजीपाला, किराणा सामान व स्वयंपाकाचे साहित्य आदी मदत मिळत आहे.यावेळी आनंद महिरे, बंडू कायस्थ, तुषार पांडे, सुमित सोनवणे, आबीद सय्यद, संगीता सोनवणे, स्मिता दंडगव्हाळ, विनोद महाले, उमेश चंडाले, महेंद्र भंगाळे, सचिन निकम, , प्रसाद वडनेरे, नानु कवडे, संतोष सोनवणे, उबेद शेख, अतुल वाणी, निखिल रांगोळे, महेश पेवाल, सोनू दिक्षति आदींसह छत्रपती शिवाजी महाराज जनसेवा मंडळ, युवा फाऊंडेशन आदी सामिजक संस्थेचे कार्यकर्ते आपला सहभाग देत आहेत.