नांदगाव : पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत; एका दिवसात महिला, बालकांसह दहा जणांना घेतला चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 11:59 PM2017-12-03T23:59:46+5:302017-12-04T00:02:05+5:30
नांदगाव : शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने एका दिवसात दहा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले असून, नगरपरिषदेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
नांदगाव : शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने एका दिवसात दहा जणांना चावा घेऊन गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले असून, नगरपरिषदेने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
पिसाळलेला कुत्रा एखाद्या हिंस्त्र जंगली श्वापदाप्रमाणे अचानक पाठीमागून येऊन मान व गळा यावर हल्ला करतो. त्याच्या या हल्ल्यात चारजण गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी दूध आणण्यासाठी जात असलेल्या इसमावर कुत्र्याने हल्ला केला. मल्हारवाडी ते वडाळकर वस्तीकडे जाणाºया भागात कुत्र्याने चावे घेतल्याची नोंद आहे. आनंदा दाभाडे यांच्या कपाळावर आठ टाके पडले आहेत.
देवचंद गोराडे, प्रकाश जाधव, पुष्पा नागरे, सारिका गुढेकर, शीला पवार यांच्यासह गंभीर इजा झालेल्यांची नावे आनंदा दाभाडे, केवळबाई पाटील, राजीव थोरात, राहुल पवार. आंबेडकर चौकात राहुल गाडीतून खाली उतरला आणि दोन पावले चालला नाही तोच त्याला कुत्र्याने जखमी केले.
शहरात कुत्र्यांची संख्या वाढली असून, दिवसा व रात्री त्यांच्या टोळ्या गल्लोगल्ली अनिर्बंध फिरत असतात. त्यांच्यातले टोळीयुद्ध सुरू झाले की, रस्त्यावरून भरधाव एकमेकांचा पाठलाग करणारी कुत्री पादचाºयांच्या मनात भीती उत्पन्न करतात. पळता पळता ती अंगावर येतात. मग महिला व मुलांची त्रेधातिरपीट उडते. रात्री बाहेरगावाहून कोणी आले तर रस्त्यातल्या भयंकर कुत्र्यांपासून जीव मुठीत धरून घरी जावे लागते. ही कुत्री कधी कधी अकारण भुंकत अंगावर येतात.
कुत्र्यांप्रमाणेच मोकाट
गायींची संख्या वाढते आहे. गोप्रेमींकडून मिळालेल्या अन्नावर त्यांची गुजराण होते. मालकाला आयते दूध मिळते. त्या पुलावर बसून रहदारीला अडथळा निर्माण करतात. समूहाने फिरणाºया गायी रात्री गव्हाच्या शेतांमध्ये जाऊन पिकांचे नुकसान करतात. पूर्वी कोंडवाडा होता. आता तोही नाही. पुलावर व शहरातील रस्त्यांवर जागोजागी शेण
पडलेले असते. नगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष आहे. सदर प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, नगरपरिषदेच्या कर्मचाºयांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
- विश्वंभर दातीर, मुख्याधिकारी