नांदगावी निषेध मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2020 09:49 PM2020-10-02T21:49:05+5:302020-10-03T00:46:44+5:30
नांदगाव : उत्तर प्रदेशातील हाथरस येथील दलित तरु णीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचा तीव्र निषेध करत उत्तर प्रदेश सरकार बरखास्त करण्यात यावे व या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होऊन आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भरिप बहुजन महासंघ,वाल्मिकी समाज, होलार समाज व आंबेडकरी जनतेच्या वतीने करण्यात आली. यावेळी निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा जुन्या तहसीलदार कार्यालयावर काढण्यात आला.यावेळी नायब तहसीलदार राजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक संतोष मटकुळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर जेष्ठनेते नागसेन चव्हाण,वाल्मिक जगताप, अरु ण साळवे,भास्कर निकम,विलास कोतकर,गोविंद जगताप,चिंधा बागुल, भिमशक्तीचे जिल्हाध्यक्ष मनोज चोपडे, राकेश चंडोले, सोनू पेवाल, अॅड. विद्या कसबे, सुनंदा खेडकर, अलका रु पवते, सुमनबाई जाधव, विमल वाघ, सुमित्रा जाधव यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.