नांदगावला गुरुवारी सरपंच संसद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2022 05:19 PM2022-05-21T17:19:51+5:302022-05-21T17:19:51+5:30
नांदगाव : एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद व नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि २६ मे रोजी नांदगाव तालुका सरपंच संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.
नांदगाव : एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद व नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि २६ मे रोजी नांदगाव तालुका सरपंच संसदेचे आयोजन करण्यात आले आहे.
ग्रामीण भागातील सर्वांगीण विकासाशी निगडित विविध ज्वलंत प्रश्नांचे निराकरण होण्यासाठी प्रशासकीय अधिकारी व सरपंच यांच्यात विधायक संवाद घडवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. एमआयटी, पुणे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल कराड, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे या उपक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक आहेत. नाशिक महसूल प्रशिक्षण प्रबोधिनीचे संचालक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर हे संयोजन मार्गदर्शक आहेत. तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंचांना या कार्यक्रमात निमंत्रित करण्यात येणार आहे. नांदगाव सरपंच संसदेत नांदगाव उपविभागीय अधिकारी श्रीमती ज्योती कावरे, तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे व गटविकास अधिकारी गणेश चौधरी हे सरपंचांशी प्रत्यक्ष संवाद साधतील.